आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डिप्रेशन हा मानसिक आजार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्ती मरणाच्या दारात जाऊ शकते. दुर्लक्ष केल्यास होणारी डिप्रेशनची समस्या जीवघेणी ठरू शकते. या आजाराची प्रमुख कारण म्हणजे आयुष्यातील तणाव होय. तसेच चिंता करणे, निराशा येणे, कोणत्याही व्यक्तीसोबत किंवा गोष्टीमध्ये इंटरेस्ट न घेणे, यामुळे डिप्रेशनची समस्या होऊ शकते.
ही आहेत लक्षणे
१ निर्णय घेण्यास असमर्थ
निर्णय घेण्यात अडचणी येणे, चिडचिड होत असल्यास हे डिप्रेशन असू शकते. डिप्रेशनमुळे विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
२ सोशल मीडियाचा वापर
सोबतच्यांना सोडून सतत सोशल मीडियाव राहिल्याने तणावाची समस्या होते, जर्नल सायबरसायकॉलॉजी बिहेविअर अॅन्ड सोशल नेटवर्किंगने म्हटले आहे.
३ स्वप्नांमध्ये हरवणे
लक्ष वर्तमानातील गोष्टींमध्ये असल्यास आनंद मिळतो. पण लक्ष भरकटते, म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्या गोष्टींचा विचार करू लागता तेव्हा निराशा येते.
४ राग येणे
छोट्या गोष्टीवरून चिडणे, संताप होणे म्हणजे डिप्रेशनची समस्या असू शकते. तणावाचा राग, चिडचिडीशी संबंध आहे.
५ मद्यसेवन
नेहमीपेक्षा जास्त मद्याचे सेवन, हा डिप्रेशनचा संकेत आहे, असे जर्नल एडिक्शनने म्हटले आहे.
Visit : arogyanama.com