आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस गळतीची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. यामागे विविध कारणे असतात. वाढते वय आणि हार्मोनल चेंजेस ही प्रमुख कारणे महिला आणि पुरुषांमध्ये आढळून येतात. दिवसभरात शंभर ते एकशे वीस केस गळणे ही सामान्य बाब आहे. परंतु यापेक्षा जास्त केस गळत असल्यास टक्कल पडू शकते. काही आजारांमुळे सुद्धा केस गळू शकतात. अशा आजारात योग्य वेळी उपचार न केल्यास टक्कल पडण्याचा धोका असतो. आपण अशा पाच आजारांची माहिती घेणार आहोत, ज्यामुळे केस गळू शकतात.
ऐलोपेसिया एरियाटा
या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते, आणि केस गळू लागतात.
पीसीओएस
महिलांमध्ये हार्मोन्स अनियंत्रित झाल्याने ही समस्या होते. यामुळे केस कमजोर होऊन गळतात.
एनिमिया
या आजारात रक्तात ऑक्सिजन मिसळला जात नाही. यामुळे केसांना योग्य पोषण न मिळाल्याने ते गळू लागतात.
हायपोथायरॉडिजम
थायरॉईड ग्लँड अंडर अॅक्टिव्ह झाल्याने ही समस्या होते. यावेळी केस गळतात.
ल्यूपस
या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. यात केसांच्या पेशी खराब होतात, आणि केस गळातात.