आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चुकीच्या सवयींमुळे सध्या मज्जातंतूना दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे. मज्जातंतू कार्यक्षम करण्यासाठी परिवर्तित चक्रासन उपयोगी असून यामुळे इतरही अनेक फायदे आहेत. हे आसन नियमित केल्याने कोणते फायदे होतात, ते आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ मेरुदंडाचा लवचिकपणा वाढतो.
२ मज्जातंतू कार्यक्षम होतात.
३ चुकीच्या सवयीमुळे मेरुदंडास आलेली एका बाजूची वक्रता नाहीशी होते.
४ कंबर, पोट व छातीचे स्नायू बळकट होतात.
५ कंबर व पोटावरील चरबी घटते.
कधी करू नये
स्लिप डिस्क, सायटिका यांसारखे मेरुदंडाचे तीव्र दोष, तीव्र पोटदुखी असल्यास हे आसन करणे टाळावे.
Visit : arogyanama.com