आरोग्यनाम ऑनलाइन टीम –
जवळपास पन्नास टक्के लोकांना रक्तदाबाची सामान्य पातळी किती, हे माहित नसल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे यापैकी काही तरूणांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळून आले होते. जे त्यांनाही माहित नव्हते. सध्या रक्तदाबाशी संबंधित आजार मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे याबाबत प्राथमिक माहिती सर्वसामान्यांना असणे गरजेचे असते.
हे लक्षात ठेवा
१ दर महिन्याला रक्तदाब तपासून घेतला पाहिजे.
२ रक्तदाबाची सामान्य पातळी १२०/८० एमएमएचजी आहे.
३ जीवनशैली, ताण, कामाच्या ठिकाणचे वातावरण, आहाराच्या सवयी बदलल्या पाहिजेत.
४ निरोगी आयुष्यासाठी जीवनशैलीत शिस्त पाळणे आवश्यक आहे.