आरोग्यनामा ऑनलाईन – अनेक महिला दिवसभर घरात काम करत असतात, तर असंख्य महिला नोकरीसाठी दिवसभर घराच्या बाहेर असतात. या बिझी शेड्यूलमुळे त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. वेळेअभावी त्यांच्या झोपेवरही परिणाम होतो. मात्र, सतत अॅक्टिव्ह राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. महिलांनी निरोगी राहण्यासाठी भरपूर झोप घेणे गरजेचे आहे. पण ती किती घ्यायला हवी ते आज आपण वयानुसार जाणून घेणार आहोत…
* 5 ते 16 वर्ष वयोगट
8 ते 10 तासांची झोप आवश्यक आहे. शक्य नसल्यास कमीतकमी 7 तास तरी झोप घ्यावी. मात्र, यापैक्षा जास्त म्हणजे 11 तास झोपणं नुकसानकारक आहे.
* 17 ते 25 वर्ष
7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. कॉफी, चहा अशा पदार्थांचे सेवन करू नका.
* 26 ते 60 वर्ष
7 ते 9 तास झोप आवश्यक. कमी झोपल्यामुळे त्वचेवर परिणाम होऊन तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू शकता.
* 60 वर्षावरील
7 ते 8 तास झोप आवश्यक आहे.
हे लक्षात ठेवा
* हलका आहार घ्या.
* डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* चालणं, व्यायाम करणं किंवा योगा केल्यास शांत झोप येईल.
* अंगावर पांघरूण घेऊन झोपल्यास फायद्याचं ठरेल.
* रात्री झोपण्याच्या एक तास आधी मोबाईलचा वापर करू नका.
* स्क्रिनपासून स्वतःला लांब ठेवा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.