आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकजण आपल्या दिवसाची सुरूवात चहाने करतात. तर काही जण दिवसभरात अनेकदा चहा पितात. काहींना सकाळी उठल्यावर चहा मिळाला नाही तर त्यांची पुढील कामे होऊच शकत नाहीत. परंतु, अशाप्रकारे रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. चहामधील कॅफीनचा ब्लड प्रेशरवर प्रभाव पडतो. रात्रभराच्या झोपेत शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, सोबतच अनेक हार्मोनल बदलही होतात. कॉर्टिसोल म्हणजेच स्टेरॉइड हार्मोन्स वाढतात. यामुळे हृदयासंबंधी आजार, डायबिटीज आणि वजन वाढणे या समस्या होतात. सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने कोणते नुकसान होते ते जाणून घेवूयात.
हे आहेत धोके
1 मेटाबॉलिज्म
या सवयीमुळे मेटाबॉलिक सिस्टम प्रभावित होते. यामुळे छातीत जळजळ होते. थकवा आणि चिडचिडपणा वाढतो.
2 डिहायड्रेशन
चहातील डाययूरेटिक गुणामुळे शरीरातील पाणी बाहेर येते. जास्त तहान लागू शकते. शरीर डिहायड्रेट होते. सतत लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते.
3 तोंडाचे आरोग्य
तोंडातील बॅक्टेरिया चहामधील शुगर मारते आणि तोंडाची अॅसिडिक लेव्हल वाढते. यामुळे दातांवरील आवरणही घटते. दातांना झिणझिण्या येण्याची समस्या होऊ शकते.
4 पोट फुगणे, गॅस
चहातील दुधामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. गॅस आणि पोटाचीही समस्या होऊ शकते.