आरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाचे आरोग्य आणि झाडे यांचा खुप निकटचा संबंध आहे. झाडांपासून मिळत असलेल्या औषधींनी विविध रोग दूर ठेवता येतात. तसेच आजूबाजूला भरपूर झाडे असतील तरीही आरोग्य चांगले राहते. वातावरणात ऑक्सीजनचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी झाडे महत्वाची भूमिका पार पाडत असतात. घरात काही विशिष्ट जातीची रोपे लावल्यास ऑक्सिजनमुळे वातावरण प्रसन्न राहते. शिवाय सकारात्मक वातावरण तयार होते. घरातील वातावरणाच्या शुध्दीसाठी कोणती रोपे लावावीत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
एलोवेरा
एलोवेरा या वनस्पतीचा वापर करून अनेक त्वचारोग बरे होऊ शकतात. एलोवेराचे अनेक आरोग्य आणि सौंदर्य फायदे आहेत. तसेच एलोवेरा रात्री ऑक्सीजन सोडते. यामुळे झोप न येण्याची समस्या दूर होते.
स्पाइडर प्लांट
स्पायडर प्लांट कँसरचा धोका निर्माण करणारे केमिकल्स दूर करते. वातावरण शुध्द करण्याचे काम करते. यासोबतच वातावरणातील दुर्गंधी दूर करते. वातावरण प्रसन्न करते.
चमेली
गजरा तयार करण्यासाठी चमेलीच्या फुलांचा वापर केला जातो. चमेलीचे रोप घरातील वातावरण ताजे ठेवते. तणाव आणि अवस्थपणा दूर करते. चांगली झोप येण्यासाठी ही उपयोगी आहे.
लेवेंडर
लेवेंडर ऑइलचे अनेक फायदे आहेत. हे रोप घरात लावल्याने अनेक फायदे होतात. वातावरण सकात्मक राहते. हवा शुध्द राहते. लहान मुलांना चांगली झोप लागते.