आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हृदय हा शरीराचा अतिशय महत्वाचा आणि नाजूक भाग आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे सध्या हृदयरोगांचे प्रमाण खुपच वाढले आहे. हृदय निकामी होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, कार्डियक अरेस्ट आदी गंभीर समस्या होतात. अनेकांना या रोगांमुळे प्राणही गमवावे लागतात. सध्या तरूणांमध्ये हृदयरोगांचे प्रमाण वाढले आहे. हृदयाचे आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी योग्य आहार, चांगल्या सवयी आणि व्यायाम या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी कोणत्या तपासण्या कराव्यात आणि हृदयरोगाचे लक्षणे कोणती ते जाणून घेवूयात.
ही आहेत लक्षणे
1 निद्रानाश, चिंता आणि तणाव ही सर्वात मोठी कारणं आहेत.
2 श्वास घेण्यास त्रास होणे
3 सतत केस गळणे
4 दिवसभर थकवा जाणवणे
5 पोटदुखी, शरीरातील कोणत्याही भागात सूज येणे.
6 सतत पोटाच्या समस्या होणे.
या तपासण्या करा
1 ईसीजी/स्ट्रेस टीएमटी
ही तपासणी ईसीजीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. या टेस्टमध्ये शरीराला एखादी अॅक्टीव्हिटी देऊन थकवण्यात येते. त्यानंतर हृदय किती ताण सहन करू शकते, हे ईसीजी करून चेक केले जाते.
2 सीटी स्कॅन
हृदयाचे सीटी स्कॅन केले जाते. ही तपासणी करताना हृदयाची संरचना, कोरोनरी सर्कुलेशन आणि रक्त वाहिन्यांची स्थिती जाणून घेता येते.
3 कोलेस्टेरॉल टेस्ट
कोलेस्टेरॉल एमजी/डीएलमध्ये मोजण्यात येते. यामुळे चांगल्या आणि वाईट कालेस्टेरॉलचे प्रमाण समजते.
4 ईकेजी टेस्ट
सतत छातीमध्ये दुखत असल्यास ईकेजी नावाची टेस्ट केली जाते. यास ईसीजी असेही म्हणतात. या टेस्टमधये रूग्णाच्या शरीरावर छोटे छोटे इलेक्ट्रोड पॅच लावून हृदयाच्या इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यात येतात.