आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डेंग्यू आणि मलेरियाचे रूग्ण सध्या अनेक शहरात वाढले आहेत. हे आजार डासांमुळे पसरतात. सध्या डासांचा प्रादर्भाव वाढल्याने हे दोन्ही आजार मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. काही घरगुती उपाय केल्याने डेंग्यू, मलेरियाचे डास पळवून लावता येऊ शकतात. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 तुळशीची पाने, पुदीना, झेंडूची फुले, लिंबू, कडुलिंब हे डास पळवून लावण्यासाठी उपयोगी आहे.
2 लिंबाचे तेल आणि निलगिरीचे तेल एकत्र करून वापरावे.
3 कापूर एका खोलीमध्ये जाळून दरवाजे खिडक्या बंद करून ठेवा. यामुळे डास घरामध्ये येणार नाहीत.
4 नारळाच्या तेलामध्ये कडुलिंबाचे तेल मिसळून वापरावे. यामुळे डासांपासून बचाव होतो.