आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे आहार, कामाच्या सवयी यावर परिणाम झाला आहे. शिवाय व्यायाम करण्यासाठी ही लोकांकडे वेळ नाही. यामुळे अनेक आजार वाढत आहेत. त्यातच गॅस आणि अॅसिडिटीची समस्या तर अलिकडे सामान्य झाली आहे. पोटाच्या समस्या समूळ नष्ट करण्याऐवजी औषधांचे सेवन करण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. मात्र, औषधांमुळेही समस्या बरी होण्याऐवजी आणखी वाढू शकते. पचनसंस्थेत गडबड झाल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होते. यावर केवळ औषध हाच उपाय नसून एक्सरसाइजच्या माध्यमातूनही ही समस्या सहज दूर करता येते. गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आहाराशी संबंधीत असली तरी ती शारीरिक श्रमाशीही तेवढीच संबंधित आहे. ही समस्या टाळण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज कराव्यात याची माहिती आपण घेणार आहोत.
सायकल चालवून तुम्ही आरोग्य चांगले ठेवू शकता. यामुळे पचनक्रियाही व्यवस्थित होते. शिवाय, गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही सायकल चालवण्यामुळे कमी होते. रोज थोडा वेळ सायकल चालवल्यास स्टॅमिना वाढतो आणि आरोग्यही उत्तम राहते. पचनासंबंधीचे आजार टाळण्यासाठी नियमित सायकल चालवली पाहिजे. तसेच वेगाने पायी चालण्याच्या एक्सरसाइजमुळेही आरोग्य चांगले राहते. गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर यामुळे दूर होते. गॅस, अपचन या समस्यांनी त्रस्त असणारांनी रोज कमीत कमी ५ हजार पावले वेगाने चालले पाहिजेत.
वय ४० पेक्षा जास्त असल्यास रोज १२ हजार पावले पायी चालू शकता. पोटाच्या मांसपेशींमध्ये कमजोरी आल्याने पचनसंस्था बिघडते. अॅसिडिटी किंवा गॅसचा त्रास असल्यास क्रंचेज एक्सरसाइजने फायदा होतो. क्रंजेज एक्सरसाइजमुळे पोटाचा वाढलेला घेरही कमी होतो. योगा करताना मोठा श्वास घेतला जातो. पण योगा करत नसल्यास मोठा श्वास घेण्याची सवय करून घ्यावी. दिवसातून कमीत कमी दोनदा तुम्ही मोठा श्वास घेण्याची एक्सरसाइज काही मिनिटांसाठी केल्यास पोटाची समस्या दूर होते.