आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम देणारे आसन म्हणजे द्रोणासन होय. हे आसन नियमित केल्यास अनेक आजार दूर होतात. हे केल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील तणाव कमी होतो आणि मणका लवचिक होतो. या आसनाचे विविध फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ पोटासंबंधीचे आजार कमी होतात.
२ पचनाच्या विकारांतून सुटका होते.
३ शरीरातील तणाव कमी होतो.
४ मणका लवचिक होतो.
असे करा आसन
प्रथम पाठीवर विश्राम अवस्थेत झोपून दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. दोन्ही पाय ३० अंशाचे अंतर ठेवा. डोके पायांच्या स्तरावर ठेवा. दोन्ही हात जांघांजवळ आणा. आसनातून बाहेर येताना दोन्ही पाय, हात व डोके एकत्रितरित्या जमिनीवर आणा.
Visit : arogyanama.com