पन्नाशीपर्यंत तरुण रहा, स्त्री-पुरुष दोघांनीही अवश्य करा ‘ही’ १६ कामे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे माणसाचे आयुष्यमान कमी-कमी होत चालले आहे. वयाची पस्तीशी गाठली तरी मनुष्य वार्धक्याकडे झुकल्याची जाणीव होऊ लागते. वयाच्या पन्नाशीत तर वार्धक्याची अनेक लक्षणे ठळकपणे दिसू लागतात. केस पांढरे होतात, लवकर थकवा येतो, आरोग्याच्या तक्रारी, अशा समस्या सुरू होतात. पूर्वी पन्नाशीतील व्यक्तीचे वय ओळखू येत नव्हते. ही समस्या टाळण्यासाठी काही परंपरागत नियम पाळले तर पन्नाशीत पण तुम्ही तारुण्याचा अनुभव घेऊ शकता.

या नियमांचे पालन करा

* उशिरा पचणारे पदार्थ खाऊ नका. असे पदार्थ रोग उत्पन्न करतात तसेच तारुण्याचाही नाश करतात. या पदार्थांमुळे पचनक्रियेवर ताण पडतो. जास्त तिखट, मसालेदार, चटपटीत आहार घेऊ नका.

* गरम-गरम चहा, दुध, कॉफी दातांसाठी हानिकारक आहे. याचप्रकारे जास्त थंड पेयसुद्धा दातांना इजा पोहचवतात.

* पचनक्रिया निरोगी असेल तर निश्चितच जास्त काळ तरुण राहता येते. यामुळे पचनक्रियेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. जेवण सावकाश आणि चावून-चावून करावे.

* खूप थकवा आल्यानंतर लगेच जेवण करू नये. तसेच खूप परिश्रम केल्यानंतरही लगेच जेवण करू नये. असे केल्यास जेवण योग्य पद्धतीने पचत नाही आणि यामुळे पोटाचे आजार होतात.

* अ‍ॅसीडिटीचा त्रास असेल तर योग्य उपचार करावेत. बहुतांश आजार हे यामुळेच होतात. पोट साफ ठेवण्यासाठी त्रिफळा चूर्ण फायदेशीर ठरते.

* उपवास करावेत. उपवासामुळे शरीरातील दोष नष्ट होतात. यामुळे तरुण राहण्यासाठी उपवासही आवश्यक आहे. फळांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.

* दारू, सिगारेट, तंबाकू या व्यसनांपासून दूर राहावे, कारण यामुळे तारुण्याचा नाश होतो.

* दररोज घाम गाळणेही आवश्यक आहे. घामाच्या स्वरूपातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीराची शुद्धी होते आणि उर्जा मिळते. तरुण राहण्यासाठी शारीरिक श्रम आवश्यक आहेत.

* रात्री डाव्या कुशीवर झोपावे. दिवसा झोप घेणे शास्त्रानुसार वज्र्य आहे. परंतु दिवसा झोपायचे असल्यास उजव्या कुशीवर झोपावे. यामुळे आळस वाढत नाही. शरीरात उर्जा कायम राहते.

* जास्त काळापर्यंत मल-मुत्र आवेगाला रोखून ठेवू नये. असे केल्यास विविध प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात आणि विर्याचा नाश होतो.

* व्यायाम, योगासन अवश्य करावे. दररोज प्राणायाम आणि सूर्याला नमस्कार करावा.

* झोपण्यापूर्वी कोमट दुधाचे सेवन करावे. गरम दुध प्यायल्यास स्वप्नदोषाची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. यामुळे तारुण्याचा नाश होतो.

* दररोज स्नान करण्यापूर्वी स्वच्छ टॉवेलने शरीर घासावे, यामुळे शरीरात विद्युत शक्ती उत्पन्न होईल. या उपायाने शारीरिक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.

* दिवसभरामध्ये शरीराला हवे तेवढे पर्याप्त पाणी प्यावे. जेवण करण्यापूर्वी पाणी पिऊ नये. जेवण करत असताना थोडे पाणी पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिणे फायदेशीर राहते.

* रात्रीच्या वेळी दिवसापेक्षा कमी आहार घ्यावा. रात्री हलके आणि सहजतने पचेल असा आहर घ्यावा. जेवणातील पदार्थ खूप गरमही नसावेत.

* सकाळी लवकर उठणे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे.