वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणा हा एक आजार असून सध्या अनेक व्यक्ती या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून येते. ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लठ्ठपणा अलिकडे सर्वच वयोगटात दिसून येतो. अगदी लहान मुलांना सुद्धा ही समस्या भेडसावू लागली आहे. लठ्ठपणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. लठ्ठपणाकडे सुरूवातीस दुर्लक्ष केल्याने तो आणखी वाढतो. ही समस्या घालवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थांचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी घाम न गाळताही काही उपाय करता येऊ शकतात.
हे आहेत रामबाण उपाय
- लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवताना हिरवी किंवा लाल मिरची अवश्य खावी. यामुळे वजन नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी मिरची उत्तम उपाय असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे.
- दोन मोठे चमचे मुळ्याच्या रसामध्ये मध मिसळून हे मिश्रण पाण्यातून नियमित घेतल्यास लठ्ठपणात एक महिन्यात फरक दिसून येतो.
- सदाफुलीच्या झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करावे. त्यानंतर ताक प्यावे. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
- फक्त गव्हाची पोळी खाण्यापेक्षा, गहू, सोयाबीन आणि हरभरा मिश्रित मिठाची पोळी जास्त लाभदायक असते.
- एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून सेवन करावे. या उपायाने वजन नियंत्रणात राहते.
- सकाळी झोपेतून उठताच २५० ग्रॅम टोमॅटो रसाचे सेवन २-३ महिने केल्यास वजन कमी होते.
- भाज्यांचे सेवन अधिक करावे. केळे आणि चिकू खाऊ नये. पुदिना टाकलेला चहा पिल्यास वजन कमी होते.
- जेवतांना टोमॅटो आणि कांद्याचे सॅलड मीठ टाकून खावे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, ए आणि लोह पोटॅशिअम, लायकोपीन आणि ल्युतीन हे पोषक तत्व मिळतात.
- पपईचे नियमित सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
- दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
- पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. यामुळे बाहेर आलेले पोट कमी होते.
- आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास, कंबर लहान होते.