आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या किरकोळ आरोग्य समस्येकडे दुर्लक्ष करणे सुद्धा कधीकधी त्रासदायक ठरू शकते. कारण एखादी किरकोळ समस्या ही मोठ्या आजाराचा संकेत असू शकते. कारण ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारापूर्वी डोकेदुखीसारखी समस्या जाणवते. कधीकधी ही डोकेदुखी तीव्र होते. म्हणून अशा छोट्या आरोग्य समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ब्रेन ट्यूमर हा आजार कुणालाही होऊ शकतो. याचे संकेत आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत लक्षणे
१ अंधूक दिसणे, चष्म्याचा नंबर वाढणे, रंग आणि वस्तू ओळखण्यास त्रास होणे.
२ बोलण्यात अडचण येणे. काही शब्द आणि एखादी गोष्ट पुन्हा सांगण्यास त्रास होणे.
३ कमी बोलणे, शांत बसून राहणे, अचानक मूड खराब होणे, असा स्वभावात बदल होणे.
४ शरीराचा तोल संभाळण्यास अडचण येणे. चालताना पाय अडखळणे.
५ सतत अशक्तपणा वाटणे. थोडे चालल्यानंतरही धाप लागणे.
६ मेमरी कमजोर होणे. विस्मरण होणे.
७ आळस, काहीही करण्याची इच्छा न होणे.
८ सतत डोकेदुखी आणि सकाळी उठल्याबरोबर तीव्र डोकेदुखी होणे.
९ सकाळी उठल्याबरोबर उलटी होणे. दिवभर मळमळणे.
१० थोडावेळ अथवा जास्त वेळ शरीराच्या एखाद्या भागावर संवेदना जाणवत नाहीत.
११ वारंवार बेशुद्ध होण्याची समस्या होणे.