आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पद, पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळविण्यासाठी सर्वच धडपडत असतात. परंतु हे सर्व मिळवण्यासाठी तुमचे आरोग चांगले असणे खूप आवश्यक असते. शिवाय आकर्षक आणि सुंदर शरीर सुद्धा गरजेचे असते. बेजबाबदारपणा, माहितीचा अभाव यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करून काही लोक केवळ पैशाच्या मागे लागतात. अशा लोकांना शरीर दगा देते, आणि पुढील सर्व कार्यावर विरजन पडते. म्हणूनच आरोग्य चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आरोग्य आणि सौंदर्य मिळवण्यासाठी काही उपाय असून ते जाणून घेवूयात.
हे नियमित करा
* सकाळच्या न्याहरीत फक्त मोड आलेली कडधान्ये खा.
* दिवसा अजिबात झोपू नका.
* रात्रीचे जेवण रात्री ८ च्या आधी घ्या.
* चहा, कॉफी आणि शीतपेये शक्यतो टाळा.
* जेवल्यानंतर लगेच झोपू नका.
* दिवसातून जास्तीत जास्त दोन नाष्टा आणि दोन जेवण याहून अधिक खावू नका.
* रोज रात्री अमृतासमान गुणकारी असलेले त्रिफळा चूर्ण घ्या.
* दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान २ ते ३ किलोमीटर पायी चाला. चालण्याला एक गती असू द्या.
* रोजच्या आहारात किमान एक लिंबू असू द्या.
* सकाळी सूर्योदयाच्या वेळी दररोज एक दोन ग्लास कोमट पाणी प्या आणि काही काळ फिरून या.
* फास्ट फूड, तळलेले, अधिक फॅट असलेले, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नका.