आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळा सुरू होताच काही पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. आंबा आणि आईस्क्रीम सारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. परंतु तुम्हाला हे माहित नसेल की या वस्तू उन्हाळ्यात आपल्या शरीराचे किती नुकसान करतात. तुम्हाला आम्ही 10 अशा फुडबाबत सांगणार आहोत ज्यांचे उन्हाळ्यात जास्त सेवन धोकादायक ठरू शकते.
ग्रिल्ड मीट –
कडक उन्हाळ्यात हाय हिटवर बनवलेले जेवण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा होऊ शकतो.
आईस्क्रीम –
आईस्क्रीममध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि डायबिटीज वाढतो. कितीही आवडत असले तरी कमी खा.
ड्राय फ्रूट्स –
ड्राय फ्रूट्स उन्हाळ्यात खुप कमी खावेत. हे शरीर आतून गरम करतात.
आंबे –
उन्हाळ्यात जास्त आंबे खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. डायरिया, डोकेदुखी होऊ शकते. यासाठी कमी प्रमाणात खा.
मसाले –
वेलची, दालचीनी, लवंग, काळीमिरी सारख्या मसाल्यांमध्ये गरमी खुपच जास्त असल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि आजारी पडू शकता. साधे जेवण घ्या.
रेड मीट किंवा चरबीवाले मांस –
उष्णता खुप वाढल्यानंतर रेड मीट किंवा चरबीवाले मांस खाणे कमी करावे. यामुळे फॅट वाढते. ओव्हरवेट आणि हाय कॉलेस्ट्रोलची समस्या वाढू शकते.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
चहा किंवा कॉफी –
उन्हाळ्यात कॉफी आणि चहा डिहायड्रेशन वाढवण्याचे काम करते. त्याएवजी ग्रीन टी प्यावा.
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
डेयरी प्रॉडक्ट –
उन्हाळ्यात डेयरी प्रॉडक्ट टाळा. या काळात बॉडी हीटमुळे दूध, लोणी किंवा चीज पचन होण्यात अडचण होते.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
अल्कोहोल –
उन्हाळ्यात अनेक लोक थंड वाईन किंवा बर्फाने भरलेले कॉकटेल पितात. यामुळे शरीराचे तापमान वाढते, डिहायड्रेशन होते, इम्यून सिस्टम कमजोर होते, आजारी पडण्याचा धोका वाढतो.
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
डीप फ्राय –
ऑयली फूड्स, जंक फूड्स, तळलेले आणि ग्रेव्हीवाले पदार्थ अनहेल्दी असतात, परंतु उन्हाळ्यात यामुळे जास्त नुकसान होते. हे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात. मुरूमे येतात आणि इम्यूनिटी कमजोर होऊ लागते.
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या