केवळ बहाणा म्हणून नाही तर ‘या’ कारणांमुळे ती जवळ येण्यास देते नकार ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुष आपल्या जोडीदाराला इंटीमेट होण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा जास्तीत जास्त वेळा तिच्याकडून नकार मिळतो. यामुळे पुरूषांचा चांगला मूड खराब होतो. कारण, यामागील कारण त्यास माहित नसते. अनेकांना वाटते की ती उगाचच नाही म्हणत आहे. परंतु तिच्या नकारामागे कारण असते. ही कारणे कोणती असू शकतात हे जाणून घेवूयात
मानसिक ताण
अनेक विवाहित तरुणींना घर, कुटूंब आणि ऑफिस अशी कसरत करावी लागते. यामुळे त्यांचा मूड अनेकदा खराब असतो. तणाव असल्यामुळे त्या इंटीमेट असतानाही नकार देतात. त्यांच्या या नकारामागील कारण समजून घेतले पाहिजे. शिवाय त्यांना कामात मदत केली तर त्यांचा ताण कमी होऊ शकतो.
आपत्य
ज्या महिलेला लहान मुल असते तिला दिवसभर कामातून सवड मिळत नाही. वेळ मिळताच त्यांना आराम करायचा असतो. अशावेळी पुरूषांनी रोमांटिक होण्याची इच्छा व्यक्त केली तर नकार दिला जातो. अशावेळी जास्त फोर्स करणे योग्य नाही.
काम
ऑफिसच्या वातावरणामुळे सुद्धा महिलांचा मूड खराब होतो. अशावेळी तिला आराम करण्याची संधी द्यावी. अन्यथा नकार ऐकावा लागेल.
पीएमएस
तरुणींना प्रत्येक महिन्यात पीएमएसची समस्या असते. याचा त्यांच्या मूडवर परिणाम होत असतो. या काळात त्या सेफ्टी, इन्फेक्शन आणि प्रेग्नेंसी सारख्या गोष्टी लक्षात घेऊन इंटीमेट होण्यास नकार देतात.
लठ्ठपणा
वाढते वय, लठ्ठपणामुळे काही तरुणींना त्या पहिल्यासारख्या सुंदर राहिल्या नाही, असे वाटते. यासाठी त्या फिजिकल होण्यास घाबरतात. फक्त याच भीतीमुळे त्या इंटीमेट होण्यास नकार देतात.
घाम, अस्वच्छता
अनेक तरुणींना घामाची समस्या असते. ज्या अनहायजिनिक असण्यासोबतच डिस्टर्बेंशन निर्माण करतात. यासोबतच त्यांना व्हॅक्सिंग, क्लीनिंग यासारखे टेंशन असते. ज्यामुळे त्या स्पष्ट नकार देतात.
जोडीदाराच्या हायजीनमुळे
तरुण निष्काळजीपणामुळे अनेक वेळा हायजीनवर लक्ष देत नाहीत. परिणामी आजार आणि इन्फेक्शन होऊ शकते. तरुणी याचा विचार करूनही रिलेशनसाठी स्पष्ट नकार देतात.
हार्मोन्स
तरुण आणि तरुणींमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात जे पुर्णपणे त्यांचा मूड ठरवतात. तरुणींमध्ये जेव्हा हे हार्मोन्स वाढताच त्यांचे मूड स्विंग्स होत राहतात. ज्यामुळे त्या अनेकदा इंटीमेट होण्यास नकार देतात.
पार्टनर
काही वेळी पार्टनरच्या वागण्यामुळे त्या नकार देतात. जबरदस्ती त्यांना कधीच आवडत नाही. याव्यतिरिक्त या काळात पार्टनर काही अशा गोष्टींचा वापर करतात ज्या खुप त्रासदायक असतात. नकार देण्यामागचे हे एक मोठे कारण असू शकते.
यीस्ट इन्फेक्शन
काही तरुणींना यीस्ट इन्फेक्शनची समस्या असते, जी समस्या प्रत्येकासोबत डिस्कस करता येत नाही. यासोबतच या परिस्थितीत रिलेशन बनवने सुरक्षीत नसते. या सर्व कारणामुळे ती इंटीमेट होण्यास नकार देते.
मेनोपॉज
मेनोपॉजच्या काळात महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामुळे त्या त्रस्त आणि चिडचिड्या होतात. काही वेळा त्या उत्तेजित होऊ शकतात, परंतु अनेकदा नकार देतात.
Comments are closed.