आरोग्यनामा ऑनलाईन टीम – निरोगी, नितळ, सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी काही खास उपाय आहेत. हे उपाय केल्यास त्याचा अतिशय चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. घरच्या घरी त्वचा उजळ करण्यासाठी असलेले काही खास उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
* मध, दुध, पपई आणि दुध पावडर एकत्र करून हे मिश्रण लावल्यास चेहरा चमकदार होतो. सुरकुत्या नष्ट होतील.
* बदाम तेलात चंदन पावडर मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा हेल्दी होते.
* अर्धा चमचा मध घेऊन त्यामध्ये चिमुटभर दालचिनी टाकून हे मिश्रण लावावे. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
* काकडीचा रस काढून त्वचेवर लावा. तेलकट त्वचेसाठी हा उत्तम उपाय आहे.
* दही लावून थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने रंग उजळेल.
* नारळ पाणी लावल्यास काळे डाग नष्ट होऊन चेहरा सुंदर दिसेल.
* त्वचेवर बदाम तेलाने मालिश करा. अर्धा तासानंतर त्वचा स्वच्छ धुवून घ्या. या तेलामध्ये तुम्ही केशर टाकू शकता. या उपायाने चेहरा उजळ होईल.
* अर्धे लिंबू घेऊन दररोज त्वचेवर रगडा. हे एक ब्लिचिंग एजंट असून, यापासून घरीच त्वचेची निगा राखू शकता.
* बटाट्याचा रस काढून दररोज त्वचेवर लावल्यास थोड्याच दिवसात फरक पडतो.
* टोमॅटोमधील गर काढून चेहरा आणि गळ्यावर लावा. या उपायाने त्वचा स्वच्छ होते.