आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उकडलेली अंडी हा सर्वात सोपा असा नाश्ता आहे. कुणीही अगदी सहज अंडी उकडून खावू शकतो, इतकी सोपी ही कृती आहे. मात्र, हे करताना काही चुका होऊ शकतात. कधीकधी अंडी उकडताना ती फुटतात. काही सोप्या टिप्स वापरुन या चुका टाळता येतात. अंडे उकडण्याची योग्य पध्दत जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ अंडी उकडताना प्रथम पाणी उकळू द्या. नंतर उकळत्या पाण्यात अंडी टाका. म्हणजे अंडी फुटणार नाहीत. त्यातील पौष्टिक घटकही टिकून राहतील.
२ अंडी मंद आचेवर केवळ दहा मिनिटे उकळणे सुद्धा भरपूर आहे.
३ अंडी उकडताना पाण्यात मीठ टाका, म्हणजे टरफल सहज निघतील.
४ जर हाफ बॉइल एग्ज खायचे असेल तर अंडी फक्त तीन ते चार मिनिटेच उकडा.
५ हार्ड बॉइल्ड एग्ज आवडत असतील तर अंडी दहा मिनिटे उकडा.
६ अंडी पूर्णपणे बुडतील एवढे पाणी ठेवा. अन्यथा अंडी फुटू शकतात.
७ अंडे उकडल्यानंतर तात्काळ थंड पाण्यात टाकू नका. यामुळे त्याच्या योकचा रंग फिकट होईल. आणि चवसुद्धा खराब होईल.
८ अंडे उकडण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे बॅक्टेरिया निघून जातील.
९ अंड्याची टरफल वरच्या भागातून काढण्यास सुरूवात करा. तेथे हवेची पोकळी असते.
१० अंडे उकडताना टिचले तर त्याठिकाणी व्हिनेगर लावा. म्हणजे पूर्ण फुटणार नाही.