आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दूध हे पूर्णांन्न असल्याने लहान मुलांना आवर्जून दिले जाते. शिवाय, निरोगी राहण्यासाठी मोठी माणसेसुद्धा दूध नियमित पितात. दुधाचे महत्व नेहमीच तज्ज्ञांकडून सांगितले जाते. परंतु, दूध आणि अंड्यांपेक्षा जास्त पौष्टिक शेंगदाणे आहेत. ज्यांना दूध आवडत नाही अशा व्यक्तींनी मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी दुधातून मिळणारे सर्व पौष्टिक घटक त्यांना मिळू शकतात. रोज मुठभर शेंगदाणे खाल्ल्याने कोणते फायदे होऊ शकतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
एवढे प्रोटीन असतात
* १०० ग्राम शेंगदाण्यामध्ये : २६ ग्राम
* १ ग्लास दूधामध्ये :३.४ ग्राम
* १ अंड्यामध्ये : ६ ग्राम
हे आहेत फायदे
१ मसल्स मजबूत होतात. सिक्सपॅक्ससाठी आवश्य आहे.
२ त्वचेची चमक वाढते.
३ बद्धकोष्ठता होत नाही. पोट स्वच्छ होते.
४ कोलेस्टेरॉल कमी झाल्याने हार्ट प्रॉब्लेम होत नाही.
५ यातील फॉलिक अॅसिड गरोदर महिलांसाठी उपयुक्त आहे.
६ यातील पॉलिफेनॉल्समुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
७ स्मरणशक्ती वाढते. अल्झायमरचा धोका कमी होतो.
८ डायबिटीज टाळण्यास मदत होते.
९ सांधेदुखीपासून आराम मिळतो.
१० डोळे निरोगी राहतात.