पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात आलू बुखार बाजारात मोठ्याप्रमाणात विक्रिसाठी येतात. गडद लाल रंगाचे हे फळ खूप आकर्षक दिसते. आरोग्यासाठी हे फळ खुपच फायदेशिर असल्याने ते आवश्य सेवन केले पाहिजे. यात भरपूर प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सीडन्ट तसेच अ, क आणि ब-६ व्हिटामिनसोबतच फायबर असते. हे फळ ताजे आणि वाळवूनही खाता येते. एका मध्यम आकाराच्या आलू बुखारमध्ये १.३ च.स. पोटॅशिअम असते. यामध्ये काही प्रमाणात लोहही असते.

हे आहेत आश्यर्यकारक फायदे

* आलू बुखारमध्ये अनेक पोषकतत्व असतात. यात बिटा कॅरोटिनही असते. यामुळेच याच्या सेवनाने कॅन्सरच्या पेशी सक्रिय होत नाहीत.

* आलू बुखारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे फळ नियमित खाल्ल्याने रक्त वाढते. तसेच उच्च रक्तदाबाचा त्रासही कमी होतो.

* यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा तजेलदार होते. तसेच स्मरणशक्तीही वाढते.

* आलू बुखारमध्ये असणारे व्हिटमिन के आणि पोटॅशिअम हदयाचे आजार दूर करते.

* वजन कमी करण्यासाठी आलू बुखार खावे. आलू बुखार खाण्याने लवकर भुक लागत नाही आणि वजन नियंत्रीत राहते.

* याच्या सेवनाने शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रीत होत असल्याने मधुमेहावर गुणकारी आहे.

* शरीराची मिनरल शोषून घेण्याची क्षमता वाढते. यामुळे उर्जा वाढते आणि ताजेतवाने वाटते.

* यातील मुबलक क व्हिटामिनमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. सर्दीचा त्रास असणारांनी आलू बुखार खाल्ल्याने फायदा होतो.

* यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. आतडे चांगले राहतात आणि लिव्हरसंबधी सर्व आजार नाहिसे होतात.

* आलू बुखारमधील फायबरमुळे पचनसंस्था चांगली राहते.

* अ व्हिटामिन असल्याने डोळ्यांचे आजार कमी होतात.