स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – समोरच्या व्यक्तीने जांभाई दिल्यास आपल्यालाही जांभाई का येते? डोक्यात दिवसभरात किती विचार येतात? स्वतःच्या हाताने गुदगूल्या का होत नाहीत? असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. या प्रश्नांचा संबंध थेट मेंदूशी आहे. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून शरीराचे सर्व काम मेंदूद्वारेच चालते. मेंदुविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी असून त्या जाणून घेवूयात.
किती विचार येतात
अंदाजे एका दिवसात मेंदूमध्ये ७० हजार विचार येतात. खरेतर यातील अनेक विचार असे असतात जे पुन्हा-पुन्हा येतात.
ताणव मेंदू सेल्सला मारतो
तणाव मेंदूच्या सेल्सला मारु शकतो. तणामुळे मेंदूमध्ये अशा हार्मोन्सचे प्रमाण वाढते जे काही वेळेसाठी असतात. परंतु मेंदूच्या सेल्सला नष्ट करु शकतात.
७५ टक्के पाणी
शरीराप्रमाणेच मेंदुमध्ये ७५ टक्के पाणी असते. यामुळेच शरिरात पाणी कमी झाल्यास नजर धुसर होते. तसेच डोकेदुखते.
वेसेल्स लांबी
मेंदूमध्ये अनेक ब्लड वेसेल्स असतात. यांची एकत्र लांबी १ लाख मीटर असेल.
स्वतःच्या हाताने गुदगूल्या का होत नाही
कारण मेंदू स्पर्शाला ओळखतो. म्हणूनच जर इतर व्यक्तीने अचानक गुदगूल्या केल्या तर त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि गुदगूल्या होतात.
जांभई येणे
एखाद्याला जांभई देताना पाहुन आपल्यालासुध्दा जांभई येते. कारण मेंदूमध्ये काही असे सेल असतात जे आरशा प्रमाणे काम करता. ते समोरच्याशी जोडतात. हे सेल लोकांसोबत मिळुन मिसळून राहण्यास मदत करतात.
केमिकल
जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो किंवा तरुणी जेव्हा आई होते. तेव्हा मेंदूमध्ये ऑक्सीटॉसिन नावाचे केमिकल मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. कारण आपण अन्य व्यक्ती सोबत आणि बाळासोबत चांगले संबंध बनवू शकतो.
प्रत्येक भागाकडे एक काम
आपण मेंदू फक्त १० टक्केच वापरतो. परंतु हा एक भ्रम आहे. मेंदूच्या प्रत्येक भागाकडे एक काम असते. आपण रोज जे काम करतो. त्याची जबाबदारी मेंदूकडे असते.
नेटवर्क बनते
मेंदूमध्ये काही विचार येतो, तेव्हा मेंदूमध्ये खास नेटवर्क तयार होते. एक सारखे विचार आणि घटना त्याच खास नेटवर्कला सक्रिय करता.
Comments are closed.