रोज सकाळी एक वाटी अंकुरित मूग खाल्ल्यास होतील ‘हे’ १० खास फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवणात अंकुरित म्हणजे मोड आलेल्या धान्याचा समावेश केल्यास विविध आरोग्यदायी फायदे होतात. अंकुरीत मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन मिळते. अंकुरित मूग रिकाम्या पोटी खाणे खूप चांगले असते. अंकुरित मूग खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते पाहूयात.

हे फायदे होतात

* मसल्स
यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्याने मसल्स मजबूत होतात.

* कमजोरी
यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होऊन उर्जा मिळते.

* निरोगी केस
यातील अँटीऑक्सिडेंटमुळे केस लांब, घनदाट होतात.

* रोग प्रतिकारशक्ती
हे खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार दूर राहतात.

* वजन कमी होते
यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते म्हणून वजन कमी होते.

* डायबिटीज
अंकुरित मुग खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.

* कँसर
यामध्ये पॉलिफेनॉल्स असतात. जे कँसरपासून आपल्याला दूर ठेवतात.

* संधीवात
अंकुरित मुगात असलेले अँटी इम्फ्लेमेटरी गुण संधीवाताचा प्रभाव कमी करण्यास उपयोगी पडतात.

* त्वचा उजळते
हे खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे त्वचा उजळते.

* डायजेशन
अंकुरित मुगात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.