आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दूध पिणारे लोक ५ टक्के जास्त सक्रिय आणि जास्त स्मरणशक्ती असणारे असतात. कोमट दुध पिण्याचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध प्यायल्याने शरीराचे अनेक रोग दुर होतात आणि शरीर निरोगी राहते. दुधामधील विविध पोषकतत्त्व मेंदुसाठीसुद्धा फायदेशीर असतात. जे वयस्कर लोक दुध पितात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते.
हे आहेत फायदे
१) कँसरग्रस्त तसेच दात कमकुवत असणारांनी कोमट दूध प्यायल्याने फायदा होतो. दूध एक असा आहार आहे जो शरीरीतील सर्व आहारांची कमतरता पुर्ण करतो.
२) अनेक लोकांना झोप न येण्याची समस्या असते. असे असेल तर झोपण्याआधी एक कोमट ग्लास दूध प्या. दूधामध्ये अमीनो अॅसिड असते जे मेंदू शांत ठेवते आणि झोप येण्यास मदत करते.
३) गळ्यात दुखत असेल आणि सर्दी झालेली असेल तर दूध एक औषध म्हणून काम करते. हे गळ्यात संक्रमण निर्माण करणारे जीवाणु नष्ट करते आणि दूखणे बरे करते.
४) रात्री झोपण्याआधी एक कप कोमट दूध प्या. बध्दकोष्ठचा आजार दूर होईल.
५) कोमट दूध शरीराला पुर्णपणे रिचार्ज करते. व्यायाम केल्यानंतर थोड्या वेळाने कोमट दुध प्यावे.
६) कोमट दुधामध्ये व्हीटॅमिन आणि प्रोटिन जास्त प्रमाणात असते, यामुळे डेली डायटमध्ये याचा उपयोग करावा. मजबूत मांसपेशींसाठी ब्रेकफास्टमध्ये दूध नक्की प्यावे.
७) जर तुमचे दात संवेदनशील असतील तर कोमट दूध तुम्हाला फायदेशीर आहे. कोमट दूधामध्ये कॅल्शियम, आयोडीन आणि फॉस्फोरस असते हे दातांना मजबुत बनवते. जेवण करतांना दूध प्यायल्याने दातांवरची कोटींग चांगली राहते.
८) तणाव असेल तर कोमट दुध प्यावे, यामुळे रिलॅक्स वाटेल. कोमट दुध मांसपेशी आणि शिरांना तणाव मुक्त करते.
९) खूप काम केल्यानंतर थकवा जाणवल्यास कोमट दूध प्यायल्याने शरीरामध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण होईल.
१०) अनेक महिलांना पीरियड्समध्ये सतत मूड बदलण्याची अडचण असते. अशावेळी एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने चांगले वाटेल.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)