१ मुळव्याध
मुळव्याध असलेल्या रुग्णाने दुपारच्या जेवानंतर एक ग्लास ताकामध्ये ओवा टाकून घेतल्यास आराम मिळेल. शिवाय नियमित दही सेवन केल्यास आराम मिळेल.
२ उष्णता कमी करते
दह्याचे ताक आणि लस्सी करूण प्यायल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होते. पोट बिघडले असेल तर भातासोबत दही खाल्ल्याने आराम मिळेल.
३ हृदयविकार
उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचे आजार, याशिवाय हृदयात वाढणारे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रीत ठेण्याचे काम दही करते.
४ मजबूत हाडे
दह्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडाच्या पोषणासाठी मदत करते. दात आणि बोटाची नखे दह्यामुळे मजबुत होतात.
५ सांधेदुखी
दह्यामध्ये थोडे हींग मिसळून खाल्ल्यानंतर सांधेदुखी, गुडघेदुखी यासारखे आजार बरे होतात.
६ घाम
कधीकधी घामाचा वास जास्त येतो. दही आणि बेसन पीठाच्या मिश्रणाने शरीराला मालीश करून स्नान केल्याने शरीरावर घाम येणार नाही.
७ केसाचे सौंदर्य
दह्याच्या तयार करण्यात आलेल्या ताकाने केस धुतल्यानंतर आणि दह्यानी मालीश केली तर केस स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागतात.
८ तोंड आल्यानंतर
शरीरातील उष्णतेमुळे तोंडात फोड येतात. या फोडांवर दह्याची मलाई लावल्यानंतर तोंडातील फोड जातात.
९ वजन
सडपातळ व्यक्तिने रोज आहारात दह्यासोबत खिसलेले खोबरं आणि बदाम खाल्ल्यास वजन वाढवता येते.
१० रोगप्रतिकारक शक्ती
दही खाल्ल्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. दमा आणि अॅलर्जीसारख्या रोंगापासून आराम मिळू शकतो.