आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कारले हे चवीला कडू असले तरी त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यासाठी ते आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. ही एक औषधीय भाजी आहे. कारले भूक आणि पाचनशक्ती वाढवते. कारल्याप्रमाणे त्याची पाने सुद्धा तेवढीच गुणकारी आहेत. कारल्याच्या पानांचा उपयोग करून अनेक रोग दूर करता येतात. याविषयी सविस्तर माहिती आपण करून घेणार आहोत.
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब असल्यास नियमित कारले खावे. रक्तदाब सामान्य राहतो. यातील पोटॅशियम आणि कॅल्शियममुळे रक्तदाब कमी होतो.
गर्भनिरोधक
पीरियड्सच्या पाचव्या दिवशी कारल्याच्या पानांचा रस प्यायल्याने गर्भ धारणा होत नाही. कारण यातील एक प्रोटीन पुरुष आणि महिलांमध्ये गर्भनिरोधक म्हणून काम करते.
डिटॉक्स
कारल्याच्या पानांचा रस प्यायल्याने रक्त शुध्द राहते. याचे सेवन केल्याने शरीर निरोगी होते, त्वचेचे पिंपल्स, डाग दूर होतात.
एचआयव्ही
कारल्याच्या पानांमध्ये इम्यूनिटी वाढवण्याचे गुण असतात. यामुळे हे एचआयव्हीचे व्हायरस नष्ट करण्यात साहय्यक असतात.
कँसर
नियमित कारल्याची पाने खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा कँसर बरा होतो, असे म्हटले जाते. कारल्याच्या पानांमधील अँटी-कँसर कम्पोनेंट्स कँसरच्या कोशिकांची शक्ती नष्ट करते.
डायबिटीज
डायबिटीजमध्ये कारल्याचे पान खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते.
अँटी मायक्रोबियल गुण
अनेक आजार हे बॅक्टेरिया, फंगल किंवा व्हायरसमुळे होतात. कारल्याच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुण असतात. यामुळे या समस्या होत नाहीत.
मलेरिया
कारल्याच्या पानांचे सेवन केल्याने मलेरियात फरक पडतो. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. यामुळे मलेरियाचा ताप कमी होतो.
गजकर्ण
कारल्याच्या पानांचा रस आणि गुलाबजल मिसळून लावल्याने गजकर्ण दूर होते. यामध्ये अँटी-इन्फ्लमेशन गुण असतात. हे गजकर्ण आणि संक्रमण वाढू देत नाही.