आरोग्यानामा ऑनलाईन टीम : फळांमधून शरीराला आवश्यक घटक मुबलक प्रमाणात मिळत असल्याने आहारतज्ज्ञांसह डॉक्टरही नियमित फळे खाण्याचा सल्ला देत असतात. फळांमधील औषधी गुणधर्मांमुळे अनेक आजार दूर राहतात. शरीराला ताकद मिळते. विशेष म्हणजे सौंदर्यवृद्धीसाठी नियमित फळे खावीत, असे तज्ज्ञ सांगतात.
हे आहेत फायदे
१ लिंबूचे रोज सेवन केल्याने काळे डाग, मुरूम आणि ओरखडे दूर होतात.
२ रोजसकाळी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते.
३ भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने चेहरा उजळतो.
४ पालकाची भाजी नियमित खाल्ल्याने चेहरा उजळतो.
५ स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रंग नैसर्गिकरित्या उजळतो.
६ रताळ्यातील व्हिटामिन ए मुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
७ सफरचंदातील सी व्हिटॅमीनमुळे त्वचा मुलायम होते.
८ सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने यातील अ जीवनसत्वामुळे त्वचा सुंदर दिसते.
९ बीट नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. चेहरा उजळतो.
१० गाजर खाल्ल्याने चेहरा टवटवीत राहतो. शरिराला अ जीवनसत्व मिळते.
Visit : arogyanama.com