#YogaDay2019 : योगा क्षेत्रातही घडवू शकता करिअर 

#YogaDay2019 : योगा क्षेत्रातही घडवू शकता करिअर 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : करिअर करण्यासाठी योगा हे एक नवे क्षेत्र असून ते दिवसेंदिवस विस्तारत आहे. यासाठी योगशास्त्रातील आवश्यक ज्ञान घेणे गरजेचे आहे. काही शाळा, कॉलेजेसमध्ये योगाशिक्षक असतात. तर काही संस्थांमध्ये योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले जाते.रामामानी अय्यंगार मेमोरियल योग संस्थान, पुणे, भारतीय विद्याभवन, दिल्ली, बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेर, कैवल्यधाम योग इन्स्टिटय़ूट,लोणावळा, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग, नवी दिल्ली, द योग इन्स्टिटय़ूट, सांताक्रुझ, परमार्थ निकेतन आश्रम, उत्तराखंड, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, बंगळुरू आदी ठिकाणी योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते.

भारतात पाच लाखांपेक्षा जास्त योगाशिक्षकांची गरज आहे. चीनमध्ये तीन हजार भारतीय योगाशिक्षक कार्यरत आहेत. युरोप,अमेरिकेसह सर्वच खंडांमध्ये योगा लोकप्रीय आहे. त्यामुळे योगाशिक्षकांची मागणी वाढत आहे. विविध देशात मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातमध्ये आर्थिक उलाढाल होते. यामुळे केवळ देशात नव्हे तर परदेशातही या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.योगाच्या प्रशिक्षण देणार्‍या संस्थां, योगा रिसर्च सेंटर, योगा अकादमी, हेल्थ रिसॉट्र्स, हॉस्पिटल्स, जिम, खासगी आरोग्य केंद्र, कॉर्पोरेट सेक्टर आदी ठिकाणी योगा टड्ढेनर्स संधी उपलब्ध असू शकते.

या क्षेत्रात काम करायचे असल्यास योगाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. व्यक्तीनुरूप योगा करण्यास सांगणे, कोणता योगा किती प्रमाणात करावा, योगा जीवनशैली आत्मसात करणे हे योगा शिक्षकांसाठी गरजेचे आहे. परदेशात योगाचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत भारतात या क्षेत्राची गती खूपच संथ आहे. काही वर्षात परदेशात योगातज्ज्ञ मोठ्याप्रमाणात तयार होऊ शकतात. आणि ज्या देशात योगशास्त्राचा जन्म झाला तेथे येऊन परदेशातील योगशिक्षक ज्ञान देऊ शकतात, असे चित्र दिसू शकते. यासाठी तरूणांनी जास्तीत जास्त संख्येने या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी दर्शविली पाहिजे. भारतात मोठ्या संख्येने योगाशिक्षण तयार होणे आजच्या घडीला अतिशय गरजेचे आहे. शिवाय, योगाशिक्षकांसाठी मागणीही आज मोठ्याप्रमात असल्याने या क्षेत्रात तरूणांनी येण्यास काहीच हरकत नाही. उलट या क्षेत्रात येऊन योग्य वाटचाल केल्यास आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु