#YogaDay2019 : योगासने कधी करावीत आणि कधी करू नयेत, जाणून घ्या

#YogaDay2019 : योगासने कधी करावीत आणि कधी करू नयेत, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कोणतेही काम करण्याची एक योग्य वेळ असते. म्हणूनच प्रत्येक कामाची एक वेळ ठरलेली असते. आणि त्या-त्यावेळी ती कामे केली जातात. परंतु, जर चांगले काम चुकीच्या वेळी केले तर फायदा कमी आणि नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. काही कामे चुकीच्या वेळी केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. योगासनांचेही तसेच आहे. योगासने कोणत्यावेळी करावी आणि कशी करावीत याचे काही नियम आहेत. त्यापद्धतीनेच योगाभ्यास केल्यास त्याचा लाभ दिसून येतो. योगशास्त्रात योगासने करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.कोणत्या वेळी योगसने करू नये याविषयी महत्त्वाच्या सूचना आहेत.अशा वेळी योगासने किंवा व्यायाम केल्यास मोठी हानी होऊ शकते.

योगासने कधी करू नयेत

– आपण आजारी असाल तेव्हा
– कोणत्याही प्रकारची नशा केली असेल तेव्हा
– भूक, झोप किंवा अन्य कारणामुळे शरीरात अशक्तपणा असेल तेव्हा
– भोजन केल्यानंतर ५ तास होण्यापूर्वी
– अतिशय भूक किंवा तहान लागलेल्या स्थितीत
– मन संतापाने क्रुद्ध असेल तेव्हा
– स्त्रीयांनी मासिक पाळी सुरू असताना

– शास्त्रात सांगितलेल्या वेळीच योगासने करावीत

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु