#YogaDay2019 : ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

#YogaDay2019 : ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : व्यक्तीच्या सेक्स ऊर्जेची दिशा जर भरकटली असेल तर त्याचा विपरित परिणाम त्याच्या वैवाहिक जीवनावर होत असतो, असे योगतज्ज्ञ सांगतात. योगाभ्यातून शरीरात सूर्य ऊर्जा उत्पन्न होते. सूर्य देवाला प्रसन्न केल्यानंतरच सौर ज्ञान उपलब्ध होत असते. सूर्य ऊर्जेचा केंद्रबिंदू म्हणजे कामवासना होय.कामवासना ही सूर्य ऊर्जेद्वारा जागृत केली जाते. सेक्स पॉवर जागृत करण्‍यासाठी योगासनांचे खूप मोठे महत्त्व आहे. सूर्य भेदन प्राणायाम, कुंडलिनी योग व योग मुद्रा नियमित केल्याने काही दिवसात आपल्या सेक्स जीवनावर त्याचा अनुकुल परिणाम जाणवेल.

शरीरात सूर्य स्वर आणि चंद्र स्वर असतात. सूर्य स्वर सक्रीय झाल्यानंतर व्यक्ती अधिक आक्रमक व उत्तेजित होतो. शरीरात सेक्स पॉवर जागृ‍त झालेली असते. तर कामक्रीडा झाल्यानंतर व्यक्ती थकतो तेव्हा शरीरातील चंद्र स्वर सक्रिय होत असतो. त्यामुळे कामक्रीडा झाल्यानंतर लगेचच झोप लागते. लठ्ठपणा सेक्स जीवनासाठी घातक ठरतो. काहींना तर जेवण झाल्या-झाल्या डुलकी येते. लठ्‍ठपणामुळे झोपेवर नियंत्रण करणे शक्य नसते. त्यामुळे कामवासनेत अरुची निर्माण होते. भरपेट भोजन केल्यामुळे निर्माण झालेला आळस व सुस्ती ही कामोत्तेजनाच्या इच्छेसाठी मारक ठरते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्‍यावर अधिक जोर दिला पाहिजे. योगसाधना करून वजन आणि लठ्ठपणा कमी करता येतो.

शरीरीक दुबळेपणामुळेही सेक्स पॉवरवर परिणाम होतो. हा दुबळेपणा घालविण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. जास्त आहार घेण्याऐवजी योगाभ्यास करून स्नायू बळकट करावेत. लठ्ठ आणि दुबळ्या व्यक्तींना आयुष्यातील हरवलेला आनंद पुन्हा मिळवायचा असेल तर त्यांनी नियमित योगाभ्यास करून आनंददायी जीवनाचा योग साधावा. यासाठी सूर्य भेदन प्राणायाम, कुंडलिनी योग व योग मुद्रा नियमित केल्याने काही दिवसात सेक्स जीवनावर त्याचा अनुकुल परिणाम जाणवतो. स्नायू बळकट होतात. तसेच कामोत्तेजीत करणारी इच्छेवर मारा करणारी चरबी देखील कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु