बैठे काम करणाऱ्यांनी अवश्य करावे ‘भुजंगासन’, दूर होईल पाठदुखी

बैठे काम करणाऱ्यांनी अवश्य करावे ‘भुजंगासन’, दूर होईल पाठदुखी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कार्यालयात बैठे काम करणारांना विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नेहमीच सतावता. यापैकी एक म्हणजे पाठदुखी होय. यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे लाभदायक आसन आहे. भुजंगासन पोटावर झोपून केले जाते. दररोज आठ ते दहा मिनिट हे आसन केल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. हे करताना शरीराचा आकार फणा काढलेल्या सापासारखा होत असल्याने यास भुजंगासन म्हणतात.

असे करा आसन
प्रथम पोटावर झोपा. हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवा. हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्या. थोडावेळ याच स्थितीत राहा. ही क्रिया ८ ते १० वेळेस करा.

हे आहेत फायदे
१) फुफ्फुसांचा व्यायाम होतो.
२) मणक्याच्या वेदना कमी होतात.
३) गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
४) बॅकबोन्सचे मसल्स मजबूत होतात.
५) कंबर लवचिक होते.

* कंबरदुखी, हर्निया, अल्सर, स्लिप डिस्क, आदी रूग्णांनी हे आसन करू नये. तसेच गरोदर महिलांनी करू नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु