‘या’ ११ गोष्टींमुळे तुम्हाला मिळू शकते आरोग्य आणि सौंदर्य !

‘या’ ११ गोष्टींमुळे तुम्हाला मिळू शकते आरोग्य आणि सौंदर्य !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चांगले आरोग्य, आकर्षक आणि सुंदर शरीर माणसाला सर्वकाही मिळवून देऊ शकते. कधीकधी भरपूर पैसा असतो, पण चांगले आरोग्य आणि सौंदर्य नसते. अशावेळी त्या पैशाचा काहीएक उपयोग होत नाही. त्यामुळे आरोग्य आणि सौंदर्य या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य मिळवण्यासाठी ११ उपाय असून ते केल्यास हे दोन्ही तुम्हाला मिळू शकते. हे उपाय अतिशय सोपे असून ते नियमित करणे गरजेचे आहे.

हे उपाय करा आणि आरोग्य, सौंदय मिळवा

* दिवसा कधीही झोपू नये.
* जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
* रात्रीचे जेवण रात्री ८ च्या आधी करावे.
* चहा, कॉफी आणि शीतपेये टाळावीत.
* दिवसात दोन नाष्टा आणि दोन जेवण, यापेक्षा जास्त खावू नये.
* रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
* सूर्योदयाच्या वेळी एक-दोन ग्लास कोमट पाणी प्यावे.
* सकाळी थोडावेळ फिरून यावे.
* रोजच्या आहारात किमान एक लिंबू घ्यावे.
* सकाळच्या न्याहरीत फक्त मोड आलेली कडधान्ये खावीत.
* फास्ट फूड, तळलेले, फॅट असलेले, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु