केसगळती का होते? यामागील कारणे आणि उपाय जाणून घ्या

केसगळती का होते? यामागील कारणे आणि उपाय जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केसगळती होण्यामागे अनेक कारणे असतात. उदाहरणार्थ अनेक दिवसांपासून आजारी असताना तसेच एखाद्या शस्त्रक्रियेनंतर अचानक केसगळती सुरू होते. आजारपणात शरीरात तणाव असल्याने असे होऊ शकते. केसगळतीची अन्य कारणेदेखील असून ती आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत कारणे

रक्ताची कमतरता
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास म्हणजेच आयर्नच्या कमतरतेमुळे केसगळती होते. यामुळे डोक्यापर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही. यामुळे फॉलीकल्सचे नुकसान होते. आणि हळूहळू केसगळती सुरू होते. यासाठी आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

अयोग्य आहार
केसांना योग्य पोषण मिळाले नाही तर ते अकाली पिकतात अथवा गळातात. यासाठी पोषक आहार घेतला पाहिजे.

अनुवंशिकता
केसगळतीच्या समस्येमागे अनुवंशिकता हेदेखील एक कारण असू शकते. कुटुंबात अकाली केस गळण्याची समस्या असेल तर केसगळतीची समस्या होऊ शकते.

हार्मोन्समध्ये बदल
हार्मोन्यचे संतुलन बिघडल्यास केसगळती होऊ शकते. गरोदरपणा, मोनोपॉज, थायरॉइड आदी समस्यांमध्येही केस गळतात.

औषधे, सप्लीमेंट्स
औषधांच्या साइड इफेक्टमुळेही केसगळती होते. तसेच काही सप्लीमेंट्समुळे केसगळती होऊ शकते.

रेडिएशन थेरेपी
केमोथेरेपीच्या काही काळानंतर केस पुन्हा येतात, पण पहिल्यासारखे येत नाहीत. ही थेरेपी शरीरासाठी तणावपूर्ण असते. यामुळे काही काळ केसगळती होत राहते.

हेअरस्टाईल, ट्रीटमेंट
सतत हेअर स्टाईल करणे अथवा केसांना घट्ट बांधल्याने केसगळती होते. तसेच स्ट्रेटनिंग, कर्लिंग आदी ट्रीटमेंटमुळेही केसगळती सुरू होऊ शकते.

गरोदरपणा
काही महिलांना गरोदरपणानंतर केसगळतीची समस्या होते. मात्र, गरोदरपणात महिलांमध्ये एस्ट्रोजनची मात्रा जास्त असते. यामुळे केस वाढतात. याकाळात केसगळती होत नाही. नंतर एस्ट्रोजनची मात्रा कमी झाल्याने केसगळती सुरू होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु