पोटाची चरबी कमी करायची आहे? करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा

पोटाची चरबी कमी करायची आहे? करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुदृढ, सुंदर आणि सुडौल शरीरासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. शिवाय, यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. परंतु, योग, व्यायाम याकडे दुर्लक्ष केल्याने सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव हे यास कारणीभूत आहे. मात्र, वाढलेली चरबी, विषेशता पोटाचा घेर कमी करण्यासाठी काही खास आणि सोपी योगासने असून त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

ही आसने करा

उत्तान आसन
सरळ उभे राहून श्वास घेत हात डोक्याच्या वर घ्या. श्वास घेत खाली वाकून डोके गुडघ्यापासून खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. हात पायांजवळ जमिनीवर टेकावेत. काही वेळ याच स्थितीत राहा. २-३ वेळा हेच आसन करा. उच्च रक्तदाब, डोकेदुखी किंवा कंबरदुखी असल्यास हे आसन करू नका.

कैची आसन
प्रथम पाठीवर झोपून हात कमरेखाली दाबावेत. नंतर पाय वर उचला आणि कैचीप्रमाणे वर-खाली करा. दोन मिनिटे हा सराव करा. कंबरदुखी, पाठदुखी किंवा स्लिप डिस्कची समस्या असल्यास हे करू नये.

हलासन
Image result for हलासन

प्रथम पाठीवर झोपून हात कमरेजवळ जमिनीवर टेकवा. नंतर श्वास घेत हळूहळू पाय वर उचलावेत. पाय डोक्याच्या मागे टेकवण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता भासल्यास हातांनी कमरेला आधार द्या. थोडा वेळ याच स्थितीत राहा. दोन ते तीन वेळा हीच क्रिया करा. उच रक्तदाब, अल्सर, पाठदुखी, हर्निया किंवा कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये.

धनुरासन
पोटाची चरबी कमी करायची आहे? करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा

प्रथम पोटावर झोपून शरीराचा वरचा भाग आणि पाय वर उचलावेत. हातांनी टाचा पकडा आणि शरीराला ताण द्या. पाच वेळा ही क्रिया करा. उच रक्तदाब, अल्सर, पाठदुखी, हर्निया किंवा कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये.

पादचक्रासन
पोटाची चरबी कमी करायची आहे? करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा

प्रथम पाठीवर झोपून उजवा पाय जमिनीवरून वर उचला. नंतर हा पाय घडाळ्याच्या काट्याप्रमाणे बारा वेळा फिरवा. यानंतर विरुद्ध दिशेने अशाच प्रकारे फिरवा. डाव्या पायाने सुद्धा असेच करा. उच्च रक्तदाब, कंबरदुखी, स्लीप डिस्कची समस्या असेल तर हे आसन करू नये.

पवनमुक्तासन
Image result for पवनमुक्तासन

पाठीवर झोपून पाय वाकवून छातीजवळ आणा. शरीराचा वरचा भाग थोडा वर उचला. नंतर हातांनी गुडघ्यावर घट्ट पकडा. नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ याच स्थितीत राहा. असे दोन वेळा करा. कंबरदुखी, हर्निया, उच्च रक्तदाब, मान किंवा गुडघ्यात काही तक्रार असल्यास पवनमुक्तासन करू नये.

नौकासन

पाठीवर झोपून शरीराचा वरचा भाग आणि पाय एकत्र वर उचला. तीस डिग्रीच्या कोनामध्ये पाय वर उचला. हातांनी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. वीस सेकंद याच स्थितीत राहा. पाच वेळा हे आसन करा. हे करताना मणक्याचे हाड एकदम सरळ असावे. हृदयविकार, पाठदुखी किंवा पोटासंबंधी समस्या असेल तर हे करू नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु