दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, दात होतील चमकदार

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, दात होतील चमकदार

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  मोत्यासारखे चमकदार आणि पांढरेशुभ्र दात सौंदर्य खुलवतात. तसेच दात निरोगी असल्यास आरोग्यसुद्धा चांगले राहते. काही वाईट सवयींमुळे दात पिवळे होतात. त्यांची चमक जाते. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आणि ते चमकदार करण्यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे घरगुती उपाय करा
बेकींग सोडा
एक चमचा बेकींग सोड्यात लिंबाचा रस टाका. ही पेस्ट ब्रशने दातांवर लावा आणि एक मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर चांगल्याप्रकारे तोंड धुवा. दात चांगले चमकदार होतील.

लिंबू
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबाची साल दातांवर घासा. लिंबू आणि मिठ एकत्र करुन दातांची मसाज करा. दोन आठवडे हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा जातो.

खोबरेल तेल
एक चमचा खोबरेल तेल दातांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीचे तुकडे करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट दातांवर लावून मसाज करावा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास पिवळेपणा दूर होतो.

संत्र्याची साल
रोज रात्री झोपताना संत्र्याची साल दातांवर घासा. यातील व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअममुळे दातांची चमक आणि मजबूती वाढते. पिवळेपणा दूर होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु