चेहऱ्यावरील अनावश्यक केसांना कंटाळलात ? मग ‘हे’ घरगुती उपाय अवलंबा

चेहऱ्यावरील अनावश्यक केसांना कंटाळलात ? मग ‘हे’ घरगुती उपाय अवलंबा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही महिलांच्या चेहर्‍यावर पुरुषांसारखे केस येतात. सामान्यतः हनुवटी आणि ओठांवरचे केस महिलांसाठी अडचणीचे ठरतात. बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम आणि जेलमुळे त्वचा खराब होण्याचा धोका जास्त असतो आणि चेहऱ्यावरचे हे केस रेजरनेही काढले जाऊ शकत नाहीत. तुम्हालाही अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल तर खाली दिलेले हे घरगुती उपाय केल्याने तुमची ही समस्या दूर होईल तसेच त्वचाही खराब होणार नाही.

१) मध आणि लिंबाचा रस

कच्च्या बटाट्याचा २ चमचे रस, रात्रभर भिजवून ठेवून बारीक केलेली तुरीची डाळ, ४ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा मध या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावून ठेवा. थोड्यावेळाने पेस्ट वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

२) हळद आणि उडीद डाळ :

हळद आणि उडीद डाळ पावडर पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करून घ्या. या उपायाने चेहरा तेलकट होणार नाही आणि चेहर्‍यावरील अनावश्यक केसही कमी होतील.

३) डाळीचे पीठ आणि दुध :

अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा दुध, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ताजी साय या सर्व गोष्टी एकत्रित करून चेहर्‍यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून २५ मिनिटांपर्यंत चेहरा तसाच ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हाताने चेहरा स्वच्छ करून नंतर पाण्याने धुवून घ्या.

४) साखर आणि लिंबाचा रस :

साखर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घ्या. या मिश्रणाने चेहर्‍यावरील नको असलेल्या केसांवर मसाज करा. पंधरा मिनिटे हे मिश्रण चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमितपणे केल्यास चेहर्‍यावरील नको असलेले केस कमी होण्यास मदत होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु