‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आपला चेहरा उजळ असावा, असे सर्वांनाच वाटते. परंतु, ज्यांचा चेहरा उजळ नसतो, त्यांना चेहरा कसा उजळेल, असा प्रश्न पडलेला असतो. परंतु, यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. तसेच त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण त्वचेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांची त्त्वचा लवकर खराब होते. ही समस्या जाणवत असेल तर घरगुती सोपे उपाय अधिक परिणामकारक ठरतात.

हे उपाय करा

१) गव्हाचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दररोज शरीरावर लावून गरम पाण्याने स्नान करावे. केशर टाकलेले दुध प्यावे.

२) थोडेसे कच्चे दुध चेहऱ्यावर लावावे. चेहरा वाळल्यानंतर त्यावर थोडेसे मीठ लावून हलक्या हाताने मालिश करावे. या उपायाने चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.

३) डाळीचे पीठ, हळद, लिंबू, दही आणि गुलाबपाणी मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चेहरा लवकर उजळतो.

४) दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमुटभर हळद एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.

५) एक चमचा मध घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. १५-२० मिनिटानंतर चेहरा धुवून घ्यावा. त्वचा तेलकट असेल तर मधामध्ये चार-पाच थेंब लिंबाचा रस टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.

६) चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दोन चमचे दही आणि एक लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.

९) काकडीचा रस काढून चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. या उपायाने चेहरा उजळतो.

१०) डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल असतील तर दररोज त्यावर कच्च्या बटाट्याच्या तुकड्याने हलक्या हाताने मालिश करावी. थोड्याच दिवसात डार्क सर्कल नष्ट होतात.

११) दररोज कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी पिल्यास त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

१२) अक्रोड खाल्ल्याने आणि अक्रोड तेलाने मालिश केल्यास त्वचा उजळते.

१३) दोन छोटे चमचे डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिसळावी. या मिश्रणात दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाकून हे मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे दुध टाकून पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट स्नान करण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावी. तासाने चेहरा धुवून घ्यावा. या उपायाने चेहरा उजळतो.

१४) चार-पाच लिंबाच्या पानांना मुलतानी मातीमध्ये पाणी टाकून बारीक करून घ्या. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

१५) मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून हे मिश्रण लावल्यास चेहरा उजळेल.

१६) १/२ चमचा चारोळ्या २ चमचे दुधामध्ये भिजवून ठेवा. काही तासानंतर बारीक करून पेस्ट तयार करून लावावी. १५ मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. हा फेसपॅक नियमित दीड महिना वापरल्यास चेहरा उजळतो.

१७) दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्यूस पिल्यास त्वचा उजळते.

१८) घराबाहेर पडताना सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावावे. सूर्यकिरणांमुळे त्वचा काळी पडू शकते.

१९) ग्रीन-टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट असतात. या चहाच्या नियमित सेवनाने त्वचेवरील डाग दूर होतात.

२०) डाळिंबामध्ये एंटी-ऑक्सीडेंटचे प्रमाण चांगले असते, जे त्वचेला तरुण ठेवते. दररोज डाळिंबाचे ज्यूस पिल्यास त्वचा उजळते.

२१) जेवणात डाळींचा वापर अवश्य करावा. डाळीतील प्रोटीनमुळे त्वचा उजळते.

२२) निरोगी शरीर आणि त्वचेसाठी दररोज आठ तासांची झोप आवश्य घ्यावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु