दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – आपण रोजच दात स्वच्छ करतो. दातांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अशी काळजी घ्यावीच लागते. दात अस्वच्छ राहिल्यास त्यामुळे आरोग्याच्या अन्य समस्याही निर्माण होण्याची शक्यता असते. दातांशी संबंधित भ्रम अनेकांमध्ये आहेत. त्यामुळे सत्य आहे, हे प्रत्येकाने जाणून घेऊन दातांची निगा राखली पाहिजे.दातांचा पांढरा रंग म्हणजे दात अत्यंत स्वच्छ आहेत, असे म्हणणे तसेच चूकीचे आहे. दात पांढरे असले तरी दातांशी संबंधित समस्या होऊ शकतात. कॅव्हिटी दातांमध्ये आणि मुळांपर्यंत निर्माण होते. कॅव्हिटी भविष्यात गंभीर होऊ शकते. तसेच दातांमध्ये जमा झालेल्या कॅव्हिटीचे काळ्या रंगात रूपांतर होऊ शकते.

चॉकलेट किंवा कोणत्याही चिकट खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने दात किडण्याची शक्यता अधिक असते, परंतु गोड पदार्थ खाणेच बंद करण्याची गरज नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा नियमित ब्रश केल्यास कोणताही त्रास होणार नाही.दातांशी संबंधित विकार आनुवंशिक नसतात. दातांची संरचना आणि जॉ-लाइन भलेही आनुवंशिक असू शकते. परंतु दातांची स्थिती स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या व दात मुळांच्या माध्यमातून जुळलेले असतात. अशा वेळी टार्टर म्हणजेच दातावर जमा झालेला पिवळा थर आणि दातांची मजबुती यांचा एकमेकांशी कोणताच संबंध नसतो.

दातांची योग्य प्रकारे स्वच्छता न झाल्यानेसुद्धा असे होते. टार्टरच तोंडाची दुर्गंधी आणि दातांच्या पिवळ्या रंगासाठी जबाबदार असतो. यामुळे दातांचा नैसर्गिक रंग निघून जातो. दात निरोगी ठेवण्यासाठी अधिक दाबाने ब्रश करू नये. यामुळे हिरड्या ढिल्या होऊन दातांची पकड कमकुवत होते.जास्त वेळ ब्रश केल्याने दातांची सफाई चांगली होते, हे चुकीचे आहे. दात कधीही तीन मिनिटांपेक्षा जास्त ब्रश करू नयेत. जास्त वेळ ब्रश करत राहिल्याने दातांच्या एनॅमलचे नुकसान होते आणि दातांचा रंगही फिका पडतो, असे तज्ज्ञ सांगातात. दातांचा रंग एकसारखा करण्यासाठी ब्लीचिंग केली जाते. परंतु, ब्लीचिंगमुळे मौखिक आरोग्याचे कोणतेच नुकसान होत नाही. ब्लीचिंग केल्यानंतर अनेकांचे दात दुखतात. मात्र, यामुळे कायमस्वरूपी कोणतेही नुकसान होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु