हा ‘डाएट प्‍लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी

हा ‘डाएट प्‍लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील सर्व अनावश्‍यक व विषारी घटक बाहेर काढण्यासाठी एक खास डाएट प्लॅन असून तो सात दिवस फॉलो केल्यास शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. यामुळे लठ्ठपणा, रक्तातील साखर आणि रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. सात दिवसांपेक्षा जास्त दिवस हा प्‍लॅन फॉलो करू नये. या डाएट प्‍लॅनमध्‍ये पौष्‍टीक आणि चांगले पदार्थांचा समावेश आहे.

सकाळी हे पेय घ्या –
रात्री १ लिटर पाण्‍यामध्‍ये काकडीचे तुकडे, लिंबू रस, ८ ते १० पुदीन्‍याची पाने, अद्रकचे काही तुकडे टाका. हे गाळून थोडे थोडे घ्‍यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. लठ्ठपणाही कमी करते.

नाष्‍टा –
नाष्ट्यामध्‍ये धने, पालक, लिंबूरस, सफरचंद बारीक करून ज्‍यूस प्‍या. एखादा पदार्थ नाही मिळाला तरी इतर पदार्थांचे मिश्रण करून घ्या. यातून चांगले पोटॅशिअम मिळते. दुसरे पर्याय म्‍हणजे ताजी फळे दही आणि ओट्ससोबत खावीत.

दुपारच्या जेवणापूर्वी –
गाजर, पुदीना आणि काकडीमध्‍ये कोथंबिर एकत्रित खा.

लंच –
मोड आलेले कडधान्य एक मोठे बाऊल, यामध्‍ये गहू, डाळ, खीर, गाजर, कीवी आणि एक चमचा जवसाच्‍या बीया घ्या. यावर ऑलिव्‍ह ऑईल आणि थोडेसे अ‍ॅप्‍पल साइडर विनेगर टाका. याशिवाय उकडलेले बटाटे आणि स्‍टीम्‍ड व्‍हेजिटेबल्‍स्‍मध्‍ये लिंबू, काळी मिरची आणि अ‍ॅपल साइडर व्हिनेगर मिसळूनही खाऊ शकता.

संध्‍याकाळचा नाष्‍टा –
भोपळ्याच्‍या बीया आणि तीन ते चार भिजवलेले बदाम खावेत.

रात्रीचे जेवण –
कांदा, मशरूम, अंकुरित धान्‍य, लसूण, ऑलिव्‍ह ऑईल ब्राऊन राईसमध्‍ये उकडून खावे. याशिवाय बेक्‍ड किंवा स्‍टीम्‍ड फिश, उकडलेले बटाटे आणि भाज्या खाऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु