तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी मदत करतील आयुर्वेदामधील ‘हे’ उपाय

तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी मदत करतील आयुर्वेदामधील ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि प्रदुषण यामुळे तरूणांमध्ये वृद्धत्वाची लक्षणे अलिकडे लवकरच दिसत आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने विविध आजार सुद्धा तरूणांना त्रासदायक ठरत आहेत. केस अकाली पांढरे होणे, अशक्तपणा, थकवा, सांधेदुखी, दृष्टीदोष या समस्या जाणवतात. हे आजार दूर ठेवण्यासाठी तरूणांनी आयुर्वेदात सांगितलेले काही उपाय केल्यास चांगला लाभ होऊ शकतो. चिरतरूण राहण्यासाठी कोणते उपाय करावेत याची माहिती घेवूयात.

हे उपाय करा

* दररोज पचण्यास हलका असलेला संतुलित आहार घ्या. आहारात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्वांचे प्रमाण जास्त असावे. बाहेरचे खाद्य, तेल, तुप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.

* अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसनाच्या दोन पाकळ्या खाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे.

* मानसिक ताण घेवू नका. चांगल्या मित्रांमध्ये वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होईल.

* आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व बारीक खडीसाखर प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकते.

* दररोज डाळिंबाचे सेवन केल्‍यास अकाली वृद्धत्व येत नाही, तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकून राहते.

* शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याच्या चुर्णात बारीक खडीसाखर वाटून मिसळावी. या मिश्रणाला दररोज एक चमचा या मात्रेत रात्री झोपण्याच्या पहिले सेवन करावे. यानंतर थोडे पाणी प्यावे.

* पांढ‍री मुसळी अथवा धोली मुसळीचे चुर्ण बनवावे. हे चूर्ण एक चमचा आणि एक चमचा वाटलेली मिश्री एकत्र करून घ्यावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत याचे सेवन करावे. शरिराला शक्ती आणि उर्जा मिळते.

* दुधाची साय आणि वाटलेली बारीक खडीसाखर एकत्र करून याचे नियमित सेवन करा. अशक्तपणा दर होतो आणि दिर्घ कालावधीसाठी शरीरात शक्ती राहते.

हे नियम पाळा

सकाळी लवकर उठा आणि रात्री योग्य वेळी झोपा.
दिवसा अथवा संध्याकाळी झोपू नका. जर कोणी आजारी आहे अथवा वृद्ध आहे, तर अशा व्यक्तीने दिवसा झोपलेले चालेल.
दररोज सकाळी व्यायाम करावा. योगासनामुळे अधिक काळ तरूण राहता येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु