ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वाढत्या वजनामुळे आपल्या कमरेचा घेरही वाढतो. कंबरेचा घेर वाढल्यामुळे व्यक्ती खूप लठ्ठ दिसू लागते. तुम्हाला जर तुमचं वजन कमी करून कंबर सडपातळ करायची असेल तर खालील आसने तुम्हाला कंबर सडपातळ करायला मदत करतील.

१) अबक्रन्चेस:

हा व्यायाम प्रकार क्रन्चेसप्रमाणेच आहे. यामध्ये झोपेच्या स्थितीत असताना गुडघे दुमडू नये. तर पायाचा ९० अंशाचा कोन करावा. आणि दोन्ही हात डोक्यामागे घ्यावे. यानंतर डोके गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करावा. या प्रकारातही पोटावरील चरबी वेगाने कमी होते.

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

२) चलनासन:

चलनासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यासाठी मोठी मदत होते. पहिल्यांदा जमीनीवर आरामात बसा आणि पाय सरळ पसरवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून ठेवावेत. आणि गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात कंबर फिरवा. एका संचात दहा वेळेस गोल फिरा. सुरुवातीला घडय़ाळ्याच्या दिशेने आणि काही वेळाने घडय़ाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा.

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

३) प्लँक:

प्लँक या व्यायाम प्रकारात कंबर सडपातळ होण्यास मदत होते. या व्यायामासाठी दोन्ही हाताच्या कोपऱ्यापासून ते हाताच्या तळव्यापर्यंतचा भाग जमिनीला लागून ठेवावा. संपूर्ण शरीर ताठ ठेवून पायाची बोटे जमिनीला चिकटून ठेवावी. या प्रकारात संपूर्ण शरीराचा भार पायाची बोटे आणि हातावर येते. अशा अवस्थेत शरीर खाली आणि वर करण्याचा प्रयत्न करा. वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्यास हा प्रकार करू नये. प्रथम आहार आणि साध्या व्यायामाने वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा.

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

४) वक्रासन:

या योगासनाच्या प्रकारात प्रथम दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून बसा. आणि दोन्ही हात हाताच्या सरळ रेषेत जमिनीवर टेकवा. उजवा पाय हळूहळू दुमडून घ्या. या वेळी डावा पाय सरळ रेषेत ठेवा. उजवा हात उजव्या दिशेने वळून मागे ठेवा. त्यानंतर डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ जमिनीवर ठेवा. नंतर मान हळूहळू मागच्या दिशेला वळवत मागे पाहण्याचा प्रयत्न करा.

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु