मानसिक ताण दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय, करा ‘हा’ खास व्यायाम

मानसिक ताण दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय, करा ‘हा’ खास व्यायाम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेली जीवनशैली, स्पर्धा, कामाचा ताण यामुळे मानसिक ताण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. हा ताणतणाव दूर करण्यासाठी योगासन हा सर्वात चांगला मार्ग आहे. मानसिक ताण दूर करण्यासाठी वृक्षासन केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. दररोज हे दहा मिनिटे केल्यास आरोग्याच्या विविध समस्या दूर होतात. शिवाय मानसिक आरोग्य चांगले राहते. वृक्षासनचे ५ फायदे आणि करण्याची पद्धत जाणून घेवूयात.

असे करा आसन

प्रथम सरळ ताठ उभे राहावे. त्यानंतर उजवा पाय डाव्या पायावर ठेवा. दोन्ही हात प्रार्थना मुद्रेमध्ये छातीजवळ आणा. उजव्या पायाच्या तळव्याने डावा पाय दाबा. डोके सरळ ठेवून समोर पाहा. श्वास घेऊन हात डोक्याच्या वर घेऊन जा. वीस सेकंद थांबा. चार ते पाच वेळेस असे करा.

होतील हे फायदे

१) शरीर लवचिक होते. मसल्स मजबूत होतो.
२) स्ट्रेस आणि टेन्शन दूर होते.
३) मुलांची उंची वाढते.
४) शरीर आणि मेंदुचा बॅलन्स आणि कॉन्सन्स्ट्रेशन वाढवते.
५) शरीर ताणले गेल्याने वेदनेपासून आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु