मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि तणाव मुक्त राहण्यासाठी नेहमी मेडिटेशनचा सल्ला दिला जातो. यामुळे फायदा ही होतो. मेडिटेशनचे विविध प्रकार असतात. मेडिटेशन करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे घरजेचे असते. चला जाणून घेऊ या काळजी बद्दल

image.png

– मेडिटेशन आपण डोके शांत ठेवण्यासाठी करतो. तर मेडिटेशन करताना नेहमी शांत जागा निवडा. कारण मेडिटेशन करताना नेहमी शांततेची गरज असते.

image.png

–  मेडिटेशन आपण कधीही करू शकतो. पण शक्यतो मेडिटेशन नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावा.

– मेडिटेशन करताना नेहमी योग्य आसनामध्ये बसावे. मेडिटेशन करताना नेहमी रिलँक्स होऊन आरामदायक आसनामध्ये बसावे. मेडिटेशन करताना कोणत्याही गोष्टींचा विचार डोक्यात आणता कामा नये.

image.png

– मेडिटेशन नेहमी काहीही खाण्याच्या आधी करावा. जर तुम्ही काही खाल्यानंतर मेडिटेशन केल्यास तुम्हचा मेडिटेशन मध्ये लक्ष लागत नाही.

image.png

– अधिक फायद्यासाठी मेडिटेशन दरम्यान दीर्घ श्वास घेणे आणि सोडण्याची प्रक्रिया केली पाहिजे. यामुळे शरीर आणि डोक्याला शांती मिळते.

– नेहमी हसत रहावे आणि चेहऱ्यावर नेहमी एक हास्य ठेवावा. अशा मुळे मेडिटेशन करताना चांगला अनुभव येतो आणि तणाव कमी होतो.

image.png

– मेडिटेशन संपण्याच्या वेळी लगेच डोळे उघडू नये. हळू हळू डोळे उघडावे.यामुळे डोळ्यावर ताण येत नाही.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु