रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास होतील ५ फायदे, जाणून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास होतील ५ फायदे, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सकाळी आंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण ताजेतवाने होऊन दिवसभराच्या कामाला सामोरे जाण्यास सज्ज होतो. सकाळची आंघोळ महत्वाची आहेच, पण रात्री झोपण्यापूर्वी थंड अथवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. यामुळे अनेक आरोग समस्यांना दूर ठेवता येते. रात्री थंड अथवा गरम पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ रात्री चांगली झोप येते. दिवसभरातील थकवा दूर होतो. अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. शांतीचा अनुभव येतो. थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते.

२ थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन आणि चरबी कमी होते.

३ पिंपल्सची समस्या असेल तर रात्री थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. केस चांगले होतात. त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र उघडतात.

४ थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. रक्त पुरवठा चांगला होतो. व्हाईट सेल्स वाढतात.

५ थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो. मेंदूला थंड होतो. शारीरिक सौंदर्य टीकून राहते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु