‘ब्युटी ट्रीटमेंट’ न घेता ‘या’ पद्धतीने काढा चेहऱ्यावरील केस

‘ब्युटी ट्रीटमेंट’ न घेता ‘या’ पद्धतीने काढा चेहऱ्यावरील केस

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक महिलांच्या चेहऱ्यावर खूप अनावश्यक केस असतात. ते काढण्यासाठी त्यांना ब्युटी पार्लरमध्ये जावे लागते. त्यामुळे महिलांचा चेहरा ताणला जातो. आणि त्यांना खूप त्रास होतो. आणि कधीकधी त्यांचा आत्मविश्वासही खूप कमी होतो. त्यामुळे त्यांना त्या केसांचं काय करावं कळत नाही. पण हे केस त्या खालील घरगुती पद्धतीने काढू शकतात.

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी असा बनवा फेस पॅक :

साहित्य :

१) एका अंड्यातील पांढरा भाग

२) अर्धा टीस्पून कॉर्नफ्लॉवर

३) एक टीस्पून साखर

हे साहित्य एका भांड्यात मिसळा. अंड्याच्या पांढऱ्या भागात साखर आणि कॉर्नफ्लॉवर नीट मिक्स करून घ्या. हे मिश्रण मिक्स केल्यानंतर फेसपॅक तयार होईल. आणि हा फेसपॅक ज्या ठिकाणची केस काढायचे असतील त्या ठिकाणी लावा. हे पूर्ण वाळल्यावर पिल ऑफप्रमाणे काढा. केसांच्या दाटपणावर त्याच ओढून बाहेर येण अवलंबुन असत त्यामुळे तुमच्या केसांची वाढ पाहून हा फेसपॅक निवडा. काही महिने नियमित जर हा फेसपॅक लावला तर तुमच्या केसांची वाढ हळूहळू कमी होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु