पावसाळ्यात होऊ शकते ‘केसगळती’ ! खा दही आणि पालक

पावसाळ्यात होऊ शकते ‘केसगळती’ ! खा दही आणि पालक
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात अनेक आजार जलदगतीने पसरतात. सर्दी, खोकला, ताप, थंडीताप, जुलाब अशा आजारांच्या रूग्णांची संख्या या काळात वाढत असते. वातावरण दमट झाल्याने हे आजार जलदगतीने वाढतात. याच दमट वातावरणाचा केसांवरही परिणाम होऊ शकतो. केस गळणे आणि केसात कोंडा होणे, अशा समस्या होतात. पावसाळ्यात केसांची ही समस्या दूर करायची असल्यास आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश केल्यास ती दूर होऊ शकते. यासाठी आहारात कोणत्या गोष्टी घ्याव्यात याची माहिती आपण घेणार आहोत.
पालक  
केसगळतीच्या समस्येवर पालक चांगला उपाय आहे. पालकामध्ये लोह आणि फोलेटची मात्रा भरपूर असते. यामुळे केस गळती थांबते. पावसाळ्यात पालकांमध्ये माती जास्त असल्याने वापरण्यापूर्वी ते चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. अथवा उकळून नंतर भाजी बनवावी. पालकाचे सूपही आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.

शिमला मिरची  
तसेच शिमला मिरची सुद्धा केस गळतीवर उपयोगी आहे. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे केसांचा रुक्षपणा वाढतो आणि ते लवकर तुटतात. शिमला मिरचीमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लोह असते. जे केसांचा रुक्षपणा दूर करते. याची भाजी बनवून किंवा सलादमध्ये मिसळून खाता येते. यामुळे केस पांढरे होत नाहीत.
मेथी दाणे  
हार्मोन्समुळे केस गळण्याच्या समस्येमध्ये मेथी दाणे रामबाण औषध ठरतात. थोड्याशा नारळ तेलामध्ये मेथीचे दाणे टाकून गरम करावे, थंड झाल्यावर याने डोक्याची मालीश करावी आणि रात्रभर लावून ठेवावे. हे भाजीत मिसळून खाल्ल्यास आणखी चांगले आहे. तसेच याचे पाणी पिणे केसांसाठी लाभदायी आहे.
सूर्यफुलाच्या बिया  
सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई आणि झिंकचे एक उत्कृष्ट स्रोत आहे. केस निरोगी राहण्यासाठी हे दोन्ही महत्त्वाची भूमिका निभावतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन बी ६ चे उत्तम स्रोत आहे. ज्याला पायरीडोक्झाइन म्हणतात. या झिंकमुळे अवशोषण होते आणि स्कॅल्पपर्यंत रक्तप्रवाह वाढवते. यासोबतच केसांची वाढ होण्यास मदत करते. रोज एक चमचा बिया पुरेशा आहेत.
दही
आहारात दह्याचा समावेश आरोग्यासाठी लाभदायक आहे. सोबतच केस निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यातील खनिजे, प्रोबायोटिक बॅक्टेरिया केसांना मजबूत आणि चमकदार करतात. दह्याची लस्सी, ताक, कोशिंबीर सुद्धा खाल्ल्यास चांगला फायदा होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु