रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ‘बटाटा’ लावा आणि मिळवा ‘तजेलदार’ त्वचा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ‘बटाटा’ लावा आणि मिळवा ‘तजेलदार’ त्वचा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बटाटा ही अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन बी , लोह , कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असतात. बटाटा केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. बटाटा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पूरळ आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतो. जर बटाटा दररोज चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा काळपटपणा दूर होतो आणि ग्लोदेखील वाढतो. परंतु यासाठी बटाटा चेहऱ्यावर कसा लावावा? याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक असतं.

या पद्धतीने करा बटाट्याचा वापर –

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर एक बटाट्याचा तुकडा रगडा. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल. त्यांनतर एक चमचा बटाट्याच्या रसात , एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्याला लावा व रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल.

हा बटाट्याचा रस डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी उपयोगी असतो. हा रस स्किनवरील ओपन पोर्स बंद करण्यासाठीही मदत करतो. ज्यामुळे स्किन टाइट राहते आणि वाढत्या वयाची लक्षणंही कमी दिसतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु