तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स खूप काही सांगतात, जाणून घ्या

तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स खूप काही सांगतात, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावर पिंपल्स येणे म्हणजे तारूण्यात पदार्पण झाले, असे समजले जाते. मात्र, ही एक सौंदर्य समस्या आहे. या समस्येच्या पाठीमागे विविध कारणे असू शकतात. याबाबत द इंटरनॅशनल डर्मल इन्स्टिट्यूटने एक स्किन अ‍ॅनालिसिस सिस्टिम तयार केली असून यामुळे पिंपल्सद्वारे आरोग्य समस्यांचे अनेक संकेत मिळू शकतात. या सिस्टिममध्ये चेहऱ्याचे चौदा झोन करण्यात आले आहेत. या विविध झोनमध्ये येणाऱ्या पिंपपल्सवरून आजाराचे अनुमान काढण्यात येते.

‘द इंटरनॅशनल डर्मल इन्स्टिट्यूट’ने तयार केलेल्या या स्किन अ‍ॅनालिसिस सिस्टिममध्ये असलेले चौदा झोन कोणते, आणि त्यापैकी विविध झोनचा शरीराच्या कोणत्या अवयवांशी संबंध आहे जाणून घेतल्यास पिंपल्सच्या ठिकाणाद्वारे आजाराबाबतचे काही संकेत मिळून शकतात. हे चौदा झोन कोणते ते पाहुयात.

गाल :
गालांवर तारुण्यपीटिका येणे श्वासाशी संबंधित समस्येचा संकेत असू शकतो. धूम्रपान करणे किंवा ज्यांना जास्त अँलर्जी असते त्यांच्या गालांच्या कॅपिलरीजचे नुकसान होऊन पोर्स बंद होतात. त्यामुळे धूम्रपान टाळले पाहिजे.

डोळे :
कानासह डोळ्यांचा देखील किडनीशी संबंध असतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा सूज येणे हे किडनीच्या कार्यप्रणालीत गडबड असण्याचे संकेत आहेत. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. पाण्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

नाक :
नाकाचा संबंध रक्तदाबाशी असतो. जर नाक लाल दिसत असेल आणि त्यामध्ये सूज किंवा दाह होत असेल तर रक्तदाब उच्च असू शकतो.

हनुवटी :
हनुवटीवर तारुण्यपीटिका येत असतील तर हा हार्मोनलशी संबंधित समस्येचा संकेत आहे. मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा नंतर असे होणे सामान्य बाब आहे.

तोंडाचे दोन्ही किनारे :

तोंडाचे दोन्ही किनारे ओव्हरीशी संबंधित आहेत. अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेळी येथे तारुण्यपीटिका येतात.

मान :
सतत तणावग्रस्त असल्यास मानेच्या आसपास तारुण्यपीटिका येऊ शकतात. किडनीच्या वर असलेल्या दोन अँड्रोनल ग्रंथींची कार्यप्रणाली तणावग्रस्त असल्यावर अनियमित होते.

कपाळ :
कपाळाचा संबंध शरीराच्या पचनक्रियेशी असतो. कपाळावर तारुण्यपीटिका येत असतील तर पचनाशी संबंधित विविध समस्या किंवा विशिष्ट खाद्यपदार्थ न पचणे असा त्रास असू शकतो. अशावेळी भरपूर पाणी प्यावे आणि आहारात भरपूर वैविध्य असले पाहिजे.

भुवयांच्या मधील भाग :
आयब्रो म्हणजेच भुवयांच्या मधला भाग लिव्हरशी संबंधित आहे. येथे तारुण्यपीटिका येत असतील तर अल्कोहोल घेण्याची सवय असते किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स होऊ शकतो. अशा स्थितीत रात्री उशिरा जेवण करू नये आणि दूध व अल्कोहोलचे सेवन टाळावे.

कान :
कानाचा संबंध किडनीशी असतो. जर कान सुजलेला असेल तर तुम्हाला चहा-कॉफी यासारख्या कॅफिनयुक्त पेय पदार्थांची सवय असू शकते. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन करणे चांगले असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु