पाश्चिमात्य देशांत न्यूड योगा प्रसिद्ध, जगण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचा दावा

पाश्चिमात्य देशांत न्यूड योगा प्रसिद्ध, जगण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचा दावा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतीय योगा ला धर्माचे अधिष्ठान आहे. शरीर, मन आणि आत्मा एकत्रित आणून एकाच ठिकाणी जोडण्याच्या प्रक्रियेस योग म्हटले जाते. आत्मा परमेश्वराशी एकरूप करणे म्हणजे योग होय. तन आणि मन पवित्र करण्याची ही एक साधना आहे. मात्र, योगसाधनेचा जनक असलेल्या भारतात जेवढा योगाचा प्रचार आणि प्रसार झाला नाही, तेवढा पाश्चिमात्य देशांमध्ये झाला आहे. मुळ भारतीय असलेला योगा आता जगभरात केला जातो. परदेशात तर योगशिक्षकांना चांगले दिवस आले आहेत. भारतीय योगामध्ये आता पाश्चिमात्यांनी काही नवीन बदल करण्याचे प्रयोगही सुरू केले आहेत. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे न्यूड योगा होय.

वैज्ञानिक पुरावे
सध्याच्या युगात हा पाश्चिमात्य देशांत न्यूड योगा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. न्यूड योगा म्हणजेच निर्वस्त्र होऊन केले जाणारे योगासन होय. भारतीय या योगाला भोगी लोकांची कामलीला म्हणतात. परंतु, पाश्चात्य देशांनी याचे वैज्ञानिक पुरावे देत विशेष महत्त्व सांगितले आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून विचार केला तर नग्न होऊन करण्यात येणारा योगा सर्वात प्रथम नागा साधूंनी केला. नागा साधू निर्वस्त्र होऊन योगसाधना करत होते आणि आजही करतात.

विविध मानसिक लाभ होतात
वस्त्र परिधान करून केलेल्या योगासनांपेक्षा निर्वस्त्र होऊन केलेल्या योगासनांचा लाभ जास्त आहे. न्यूड योगा केल्याने शारीरीक लाभांसह विविध प्रकारचे मानसिक लाभही होतात, असा दावा पाश्चात्य देशातील अनेक तज्ज्ञ करतात. निर्वस्त्र झाल्यामुळे शारीरिक संरचना अत्यंत जवळून समजून घेऊ शकता. काही लोक निर्वस्त्र होणे केवळ संभोग स्थितीमध्येच पसंत करतात. जेव्हा पार्टनरजवळ जायचे असेल तेव्हाच निर्वस्त्र होण्याच्या स्थितीला योग्य मानतात. परंतु सेक्सव्यतिरिक्त न्यूड योगामध्ये वस्त्र काढण्याचे फायदे आहेत, असे हे तज्ज्ञ सांगतात.

पाश्चात्य देशात न्यूड योगा क्लासेस 
पाश्चिमात्य तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, सुरुवातीला हा योगा करताना थोडे विचित्र वाटेल, एक-दोनदा केल्यानंतर व्यक्ती स्वतःला निर्वस्त्र पाहण्यात संकोच बाळगत नाही. तसेच जो आनंद त्याला निर्वस्त्र होऊन योगा करण्यात मिळतो त्याची त्याला सवय होऊ लागते. पाश्चात्य देशात याचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन न्यूड योगा क्लास घेतला जातो. या क्लासमध्ये स्त्री-पुरुष वेगवेगळ्या किंवा एकाच ठिकाणी न्यूड योगा करतात.

हे फायदे होतात ?

* सहजपणे आसने करता येतात. निश्चिंत होऊन हा योगा करू शकता.

* तुमच्या शरीरावर प्रेम करू लागता आणि त्याला समजून घेऊ शकता. आत्मविश्वास वाढल्याची जाणीव होते. जगण्याचा दृष्टीकोन बदलतो.

* निसर्गाशी एकरूप होणे. काही लोक विशेषतः खुल्या मैदानात जाऊन निसर्गाच्या सानिध्यात हा योगा करणे पसंत करतात. हा योगा तुम्हाला निसर्गाशी जोडतो.

* न्यूड योगामुळे व्यक्ती संभोगासारख्या गोष्टींपासून दूर राहतो. येथे याचा अर्थ पूर्णपणे सेक्सपासून दूर राहणे असा नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु