लिंबूच्‍या रसामध्‍ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर

लिंबूच्‍या रसामध्‍ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर

आरोग्यनामा ऑनलाइन – अनेकजण फक्त चेहरा सुंदर दिसण्यासाठी धडपडत असतात, पण शरीराच्या अन्य भागांच्या सौंदर्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. मान काळवंडलेली असल्यास सौंदर्यात बाधा येऊ शकते. मान काळवंडलेली असेल तर एक रामबाण उपाय असून तो केल्यास तीस दिवसांत मानेचा काळपटपणा दूर होतो. दहा दिवसांत या उपायाचा परिणाम दिसू लागतो.

असा करा उपाय
लिंबू रस आणि गुलाब पाणी एकत्र मिसळा. हे मिश्रण संपुर्ण मानेला लावा. हे मिश्रण रात्री झोपण्‍यापूर्वी मानेला लावा. सकाळी मान स्वच्छ धूवून घ्‍या. काही दिवसातच काळी मान उजळलेली दिसेल.

लिंबूच्‍या रसात थोडी हळद मिसळू हे मिश्रण १० ते १५ मिनिटांपर्यंत मानेला लावून ठेवा. नंतर गरम पाण्‍याने मान स्वच्छ करा. थोडावेळ उन्‍हात जाऊ नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु